Immunity boosting vegetables: ओमिक्रॉनशी दोन हात करताना पालेभाज्या ठरताय इम्युनिटी बूस्टर
कोविडच्या नवीन व्हेरिएंटपासून बचावासाठी सुरुवातीपासूनच इम्युनिटी वाढविण्याचा सल्ला एक्स्पर्टकडून दिला जात आहे. इम्युनिटी वाढविण्यासाठी लोक निरनिराळे प्रयोग करतांना दिसता जसे की, काढ्याचे सेवन, सुपरफूड, सप्लिमेंट सेवनासह विविध प्रकारच्या औषधी घेतांना लोक दिसतात.

Immunity boosting vegetables: कोरोना व्हायरसमुळे (Covid-19 in India) प्रत्येक जण इम्युनिटी पॉवर (Immunity Power) वाढण्यावर भर देत आहे. त्यासाठी काही जण खिशाला बसणारा चटकाही सहन करतो आहे. मात्र, रोजच्या वापरातील काही पालेभाज्या (Vegetables) अशा आहेत, की त्या कमी खर्चात व सहज उपलब्ध होतात. या पालेभाज्यांचे सेवन केल्याने ओमिक्रॉनसारख्या (Omicron Variant) विषाणूविरुद्ध लढण्यासाठी इम्युनिटी पॉवर (immune system boosting) वाढण्यास मदत होते.
Also Read:
हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. मात्र, अनेकाना याबाबत माहिती असताना देखील ते हिरव्या भाज्या खाण्यास पसंती दर्शवित नाहीत. खरं तर हिरव्या भाज्या या इम्युनिटी वाढण्यास महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे गरजेचे असून सध्याच्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या विरोधात काही पालेभाज्या मजबूत इम्युनिटी देत आहे.
कोविडच्या नवीन व्हेरिएंटपासून बचावासाठी सुरुवातीपासूनच इम्युनिटी वाढविण्याचा सल्ला एक्स्पर्टकडून दिला जात आहे. इम्युनिटी वाढविण्यासाठी लोक निरनिराळे प्रयोग करतांना दिसता जसे की, काढ्याचे सेवन, सुपरफूड, सप्लिमेंट सेवनासह विविध प्रकारच्या औषधी घेतांना लोक दिसतात. मात्र दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या काही पालेभाज्या आहेत. ज्या इम्युनिटी बुस्टरचे काम चांगल्याप्रकारे करतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे. हिरव्या पालेभाज्या या नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर असून भाज्यांचा हिरवा रंग हा क्लोरोफील असून तो हिमोग्लोबिनच्या सामान आहे. यासह हिरव्या भाज्यांमध्ये जिंक, आयरन, व्हिटॅमिन आदी पोषक तत्वांसह मिनरल आढळून येते. हे सर्व घटक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास महत्वाची भूमिका बजावतात.
ब्रोकोली (Broccoli)
ब्रोकोली ही चवीला फुलगोबी सारखी असून या भाजीत व्हिटॅमिन ए, के, सी, फोलेट व फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. हे घटक इम्युनिटी वाढविण्यासाठी महत्वाचे ठरतात. ब्रोकलीच्या नियमित सेवनाने शरीरात बीटा-कैरोटीनची मात्रा वाढत इम्यून सेल्स आणि कॅन्सरशी लढणाऱ्या कोशिका वाढविण्यास मददगार ठरते.
पालक (Spinach)
पालकांमध्ये व्हिटॅमिन सी, ए, जिंक, आयरन भरपूर प्रमाणात असते. यासह अँटीअँक्सीडेन्ट आणि बीटा कैरोटीन दोघे व्यक्तीची प्रतिरक्षा प्रणालीची संक्रमणविरुध्द्व लढण्याची क्षमता वाढविते. त्यामुळे पालकाचे सेवन केले पाहिजे. कमी प्रमाणात शिजवलेली पालक ही अधिक फायदेशीर ठरते.
शिमला मिरची (Capsicum)
शिमला मिरची फायबर, अँटीअँक्सीडेन्ट आणि व्हिटॅमिन सी चा चांगला सोर्स आहे. एक कप कापलेल्या शिमला मिरचीत 190 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते. जी रोजच्या व्हिटॅमिन सी च्या गरजेपेक्षा तीन पट आहे.
फुलगोबी (Cauliflower)
फुलगोबीमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन के आणि फायबर अधिक प्रमाणात आढळून यते. हे पोषक तत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास महत्वाची भूमिका बजावितात त्यामुळे चवीला छान असलेल्या फुलगोबीचे सेवन केले पाहिजे.
गर्द हिरव्या पाले-भाज्या (Green Vegetables)
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गर्द हिरव्या पाले-भाज्या देखील महत्वाची भूमिका बजावीत असून यात अँटीअँक्सीडेन्ट, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे भाजी, सलाद आदीच्या स्वरूपात पाले-भाज्या खाणे आरोग्यासाठी हितवर्धक ठरत इम्युनिटी बुस्टरचे काम करतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या