Immunity Boosting Tips: तुमच्या इम्यूनिटीसाठी या 5 गोष्टी आहेत खूपच धोकादायक, आजपासूनच खाणं करा बंद!
Immunity Boosting Tips: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस पदार्थ खाणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणेही गरजेचे आहे.

Immunity Boosting Tips : हिवाळ्यात (Winter Season) संसर्गजन्य रोगांचा (Infectious diseases) धोका जास्त असतो. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्णही (Corona Patient) वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या इम्युनिटी (Immunity) म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीची (Immunity Power) काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. ज्याप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस पदार्थ खाणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणेही गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या हिवाळ्याच्या मोसमात खायला तुम्हाला खूप आवडतात पण त्या खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते….
Also Read:
तळलेले आणि मसालेदार पदार्थ (Fried and spicy foods)-
जर तुम्ही हिवाळ्यात जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ घरी तयार करत असाल किंवा बाहेरून मागवत असाल तर ते तुमच्या रोग प्रतिकारशक्तीसाठी अजिबात चांगले नाही. तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ रोज खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा वातावरणात जेव्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे तेव्हा अशा खाद्यपदार्थांपासून दूर रहाणेच योग्य राहिल.
फास्ट फूड (Fast Food) –
फास्ट फूडमध्ये कोलेस्टेरॉल आणि फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. हे फक्त तुमच्या प्रतिकारशक्तीसाठीच नाही तर तुमच्या हृदय, पोट, यकृत, किडनी यांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. त्यामुळे ते खाण्याची चूक करू नका. ते अधिक खाल्ल्याने तुम्ही लवकर वृद्ध दिसू लागाल.
साखरेपासून तयार केलेल पदार्थ (Made from Sugar)-
हिवाळ्यात चटपटीत खायला आवडतं, पण गोड खाण्याचीही तल्लफ असते. त्यामुळे हिवाळ्यात लोक सहज लठ्ठ होतात. पण साखर केवळ वजनच वाढवत नाही, तर रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत करते. शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला मिठाई खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही गूळ खाऊ शकता किंवा खजूर खा.
ब्रेड (Bread) –
जर तुम्ही रोज सकाळी नाश्त्यात पांढरा ब्रेड खात असाल तर खाणं लगेच बंद करा. कारण त्यामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीला हानी पोहोचू शकते. ते खाल्ल्याने रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढते. इतकेच नाही तर यामुळे CRP सारखी दाहक प्रथिने तयार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
कृत्रिम स्वीटनर (Artificial Sweetener)-
काही कृत्रिम गोड पदार्थांमुळे आतड्यातील बॅक्टेरियाची रचना बदलते. त्यामुळे पोटात समस्या निर्माण होतात आणि अन्न पचत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या