By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Importance Of Lord Sun's Worship : रविवारी अशी करा सूर्यदेवाची पूजा, संकटांपासून मुक्ती मिळत पूर्ण होतील इच्छा!
Importance Of Lord Sun's Worship : रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित असल्याने या दिवसी व्रत केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो.

Importance Of Lord Sun’s Worship : हिंदू संस्कृतीत (Hindu Culture) सूर्यदेवाला (suryadev) विशेष महत्व असून रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. मान्यतेनुसार सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रविवारी व्रत आणि पूजा (Suryadev Puja) केली जाते. उपासना आणि व्रत योग्य पध्द्तीने केल्यास चांगला लाभ मिळतो. मानसन्मान (Respect) आणि तेज प्राप्ती होते. रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित असल्याने या दिवसी व्रत केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो. यासह जीवनातील अनेक संकटांचा नाश होत आत्मिक शांतात लाभते.
Also Read:
अशी करा सूर्यदेवतेची उपासना –
– मान्यतेनुसार पूर्ण आठवडा सूर्यदेवाला जल अर्पित करू न शकल्यास रविवारी सूर्यदेवाला जल अवश्य अर्पित केले पाहिजे. तांब्याच्या तांब्यात लाल रंगाची फुलं टाकून जल अर्पित केल्याने लाभ मिळतो. जल अर्पित करतांना सूर्य मंत्राचा जप करावा.
– रविवारच्या दिवशी काळ्या रंगाच्या गायीला पोळी आणि काळ्या चिमणीला दाणे टाकावेत. यासह माशांना पिठाचे गोळे बनवून टाकावेत. तसेच रविवारच्या दिवशी पैशांसंबंधी कोणतेच कार्य करू नये.
– रविवारी परिवारातली सदस्यांच्या माथ्यावर चंदनाचा टिळा लावावा. रविवारी सूर्यदेवाचा उपवास केल्याने कार्यक्षेत्रात उच्च पद प्राप्त होते.
– रविवारी दान करण्यास विशेष महत्व असून या दिवसी तांब्याची भांडी, पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र, गहू, गुळ, लाल चंदन या वस्तू दान करणे शुभ मानले जाते.
– या दिवसी उपवास केल्याने डोळे आणि त्वचा संबधी रोगापासून मुक्ती मिळते. व्रतासोबत आदित्य हृदय स्रोतचे पठण केले पाहिजे.
– सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवारी रात्री आपल्या डोक्याच्या उशीजवळ दुधाचा ग्लास ठेवून झोपी जात सकाळी हे दूध बाभळाच्या झाडाला घालावे. यासह पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे पद प्रतिष्ठेत वृद्धी होते.
– रविवारी तेलापासून तयार केलेले पदार्थ गरजूंना खाऊ घातले पाहिजे. यासह वयोवृध्दांची सेवा करत त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
– रविवारी सकाळी घरातून निघण्याआधी गायीला पोळी खायला घालावी. यासह एका तांब्यातून पाणी वडाच्या झाडाला अर्पण करावे. मान्यतेनुसार या पध्द्तीने सूर्यदेवाची उपासना केल्यास निश्चित लाभ मिळतो.