Importance Of Masik Shivaratri: कधी आहे शिवरात्री! जाणून घ्या महत्व, तिथी, पूजा आणि मुहूर्त
मासिक शिवरात्री व्रत तसेच शिव पूजन करण्याने भक्तांचे दुःख दूर होत त्यांना आरोग्यमय जीवन लाभते. देवांचे देव महादेव हे कृपाळू आहे. त्यामुळे भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर नियमित जल अर्पित केले पाहिजे.

Importance Of Masik Shivaratri: माघ महिन्यातील (Magh Month) कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मासिक शिवरात्रीचा (Masik Shivaratri) व्रत केला जाते. भगवान शिवशंकराला (Lord Shiva) मासिक शिवरात्री अतिप्रिय आहे. या दिवशी विधिवत व्रत ठेवल्यास (Shivaratri Vrat) भगवान शंकराची कृपादृष्टी प्राप्त होते, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. यासह भगवान शंकराच्या कृपेने जीवनात आरोग्य (Health), धन, सुख, समृद्धी आदी प्राप्त होते. या दिवशी भगवान शंकर व माता पार्वती (Lord Shiva And Mata Parvati) यांची पूजा केली जाते. त्यानुसार जाणून घेऊया माघ शिवरात्री केव्हा आहे, पूजा मुहूर्त व धार्मिक महत्व काय आहे.
Also Read:
हिंदू कालदर्शिकेनुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी 30 जानेवारी रोजी आहे. शिवरात्रीला सायंकाळी 05 वाजून 28 मिनिटांनी प्रारंभ होईल. तर 31 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी शिवरात्री समाप्त होईल.
रात्री केली जाते पूजा..(Shivratri 2022)
मासिक शिवरात्रीला विशेष महत्त्व असून यासाठी रात्री पूजा केली जाते. त्यानुसार 30 जानेवारीला चतुर्दशी तिथी प्राप्त होत असून याच दिवसी व्रत देखील करता येणार आहे. सन 2022 मधील ही दुसरी मासिक शिवरात्री असून 1 जानेवारी रोजी पाहली मासिक शिवरात्री संपन्न झाली. शास्त्रानुसार भगवान शंकराची पूजा करण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही. मात्र मासिक शिवरात्रीची पूजा रात्रीच्या वेळेस करणे उत्तम समजले जाते. त्यानुसार 30 जानेवारीला रात्री 11 वाजून 38 मिनिटे ते रात्री उशीरा 12 वाजून 52 मिनिटांदरम्यान शिव पूजेचा मुहूर्त आहे.
मासिक शिवरात्रीचे महत्त्व.. (Importance Of Masik Shivaratri)
धार्मिक मान्यतेनुसार, मासिक शिवरात्री व्रत तसेच शिव पूजन करण्याने भक्तांचे दुःख दूर होत त्यांना आरोग्यमय जीवन लाभते. देवांचे देव महादेव हे कृपाळू आहे. त्यामुळे भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर नियमित जल अर्पित केले पाहिजे. यामुळे भक्तांना सुख, समृद्धी, संतात, आरोग्य, साहस आदीची प्राप्ती होते अशी आख्यायिका आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या