मुंबई : आजपासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना (Shrawan Month 2021) म्हटलं की समोर येते निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह. महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातच कावड यात्रा काढण्यात येते. श्रावण (Shrawan Mahina 2021 ) महिन्यातील सोमवारच्या तिथीला (Shrawan Somvar 2021) विशेष महत्त्व असते. श्रावण महिन्यातील सोमवार हा दिवस इच्छा पूर्ण करणारा मानला जातो.Also Read - Shrawan Month Pooja Tips: श्रावणात महादेवाची पूजा करताना स्त्रियांनी आपले केस मोकळे ठेवू नये कारण...

श्रावण महिन्याचे महत्त्व (Importance Of Shrawan Month)

श्रावण महिना भगवान शंकराला खूप प्रिय असतो. यामुळेच या काळात महादेवाची पूजा विशेष फलदायी असते. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. Also Read - Shrawan Somvar Pooja: पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे 4 उपाय, होईल अपेक्षित फळप्राप्ती

Shrawan Mahina 2021

श्रावण महिना 2021 (Shrawan Month 2021 Date)

हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे. हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो. यावर्षी पवित्र श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. Also Read - Shravan Month Jyotirlinga Darshan: 9 ऑगस्टपासून सुरू होतोय श्रावण महिना; जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगांबाबत

श्रावण सोमवार 2021 (Shrawan Somvar 2021 Dates)

यावर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार असतील. खालील तारखा लक्षात ठेवा.

  1. पहिला श्रावण सोमवार – 09 ऑगस्ट 2021
  2. दुसरा श्रावण सोमवार – 16 ऑगस्ट 2021
  3. तिसरा श्रावण सोमवार – 23 ऑगस्ट 2021
  4. चौथा श्रावण सोमवार – 30 सप्टेंबर 2021
  5. पाचवा श्रावण सोमवार – 06 सप्टेंबर 2021