मुंबई : उद्या संपूर्ण देशभरात स्वतंत्र दिवस (Independence Day) साजरा केला जाणार आहे. यावर्षी भारत आपला 75 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2021) साजरा करणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. अशामध्ये देशावर कोरोनाचे संकट (Corona Virus) आहे. कोरोना (Covid-19) अद्याप संपला नाही त्यामुळे यावर्षी देखील घरीच राहून हा खास दिवस साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून (Government) केले जात आहे. यावर्षी देखील कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. अशामध्ये तुम्ही घरीच स्वातंत्र्य दिनानिमित्त खास पदार्थ तयार करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाविषयी सांगणार आहोत…Also Read - Olive Oil Benefits For Feet: पाय दुखीच्या त्रासाने आहात त्रस्त, मग ऑलिव्ह ऑइलचा असा करा वापर!

घरीच राहून तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तिरंगा इडली (Tri Colour Idli) तयार करु शकता. ही इडली खायला देखील तितकीच पौष्टीक (Health Benefits) असते. असं तर प्रत्येकाच्या घरामध्ये इडली तयार केली जातेच. पण स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तिरंगा इडली तयार करा. आज आम्ही तुम्हाला ही तिरंगा इडली (Tiranga Idli) कशी तयार करायची याबद्दल सांगणार आहोत…. Also Read - janmashtami 2021 Special: श्रीकृष्णाचे आवडते वाद्य बासरी वाजवल्याने होतात आरोग्यदायी फायदे, कोणते ते घ्या जाणून!

तिरंगा इडली तयार करण्याची सामग्री –

– 175 ग्राम इडलीचे तांदूळ (Rice)
– 75 ग्रॅम उडीद डाळ (Urad Dal)
– 25 ग्रॅम पालक (Spinach)
– 25 ग्रॅम गाजर (Carrots)
– मीठ (Salt) Also Read - Chana Dal Hair Mask: केस गळतीने आहात त्रस्त, मग लावा चण्याच्या डाळीचा हेअर मास्क!

अशी तयार करा तिरंगा इडली –

– तिरंगा इडली तयार करण्यासाठी सर्वात आधी तांदूळ आणि उडीद डाळ दोन तास भिजवत ठेवा.

– भिजलेले तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पोस्ट तयार करुन घ्या.

– एका वाटीमध्ये हे मिश्रण काढून घ्या. त्यावर एक चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिश्रण हालवून घ्या.

– आता याला परफेक्ट होण्यासाठी जवळपास 12 तास झाकून रुम टेम्परेचरमध्ये असेच ठेवा.

– त्यानंतर तुम्ही गाजर आणि पालक मिक्सरमध्ये टाकून त्यांची वेगवेगळी पेस्ट तयार करुन घ्या.

– आता तुम्ही इडलीचे बॅटर वेगवेगळ्या तीन वाट्यांमध्ये सम प्रमाणात काढून घ्या.

– एका वाटीमध्ये असलेल्या बॅटरमध्ये पालकची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

– दुसऱ्या वाटीमध्ये असलेल्या बॅटरमध्ये गाजराची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

– तिसऱ्या वाटीमध्ये असलेल्या बॅटरमध्ये काहीच मिक्स करायचे नाही ते तसेच ठेवायचे.

– आता तीन वेगवेगळ्या रंगाचे बॅटर स्टीमर किंवा इडलीच्या कूकरमध्ये टाकून 20 मिनिटं इडली व्यवस्थित शिजवून घ्या.

– अशापद्धतीने आपली तिरंगा इडली तयार होईल.

– ही ईडली तुम्ही टोमॅटो चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा कोथिंबीरच्या चटणीसोबत खाऊ शकता.