(डिस्क्लेमर: लेखात दिलेला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे या विषयातील तज्ञांचे मत नाही)
Iron Deficiency: जाणून घ्या वयोमानानुसार शरीराला दररोज किती लोह हवे, महिलांनी तर नक्की वाचा
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याची फार काळजी घेता येत नाही. त्यामुळे शरीरात अनेक गोष्टींची कमतरता भासते. त्यापैकी एक लोह देखील आहे. लोहाची कमतरता प्रत्येक 10 पैकी 6 लोकांमध्ये दिसून येते.

Iron Deficiency Symptoms: आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याची फार काळजी घेता येत नाही. त्यामुळे शरीरात अनेक गोष्टींची कमतरता भासते. त्यापैकी एक लोह देखील आहे. लोहाची कमतरता (Iron Deficiency) प्रत्येक 10 पैकी 6 लोकांमध्ये दिसून येते. रक्त आपल्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशी (Red Blood Cells) तयार होत नाहीत. या स्थितीला अॅनिमिया (Anemia) म्हणतात. अॅनिमियाची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. लोकांना दररोज किती लोह आवश्यक आहे हे माहित नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वयोमानानुसार दररोज किती लोह घेणे आवश्यक आहे याविषयी सांगणार आहोत….
Also Read:
लोहाच्या कमतरतेची लक्षणे (Iron Deficiency Symptoms)
- थकवा
- अशक्तपणा
- त्वचा पिवळसर होणे
- धाप लागणे
- केस गळणे
- जीभ कोरडी पडणे
- घसा खवखवणे
शरीराला किती लोह आवश्यक असते?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते शरीराला किती लोह आवश्यक आहे हे तुमचे वय आणि लिंग यावर अवलंबून असते. प्रौढांपेक्षा मुलांना जास्त लोह आवश्यक असते. 4 ते 8 वर्षे वयाच्या, 10 मिलीग्राम दररोज आणि 9 ते 13 वर्षे वयोगटातील 8 मिलीग्राम प्रमाणात आवश्यक असते.
महिलांना लोहाची किती गरज असते?
महिलांना पुरुषांपेक्षा जास्त लोहाची आवश्यकता असते. मासिक पाळीमुळे महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते त्यामुळे त्यांना लोहाची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. 19 ते 50 वयोगटातील महिलांनी दररोज 18 मिलीग्राम लोहाची गरज असते. त्याच वयोगटातील पुरुषांना दररोज फक्त 8 मिलीग्राम लोह आवश्यक असते.
लोहाची कमतरता असल्यास काय खावे?
- लाल रंगाचे बीट लोहाची कमतरता त्वरित दूर करते. हिमोग्लोबिन वाढते. हे कोशिंबीर म्हणून दररोज खा.
- फळांमधे डाळिंब उत्तम आहे. दररोज डाळिंबाचे सेवन करा किंवा ते त्याचा जूस करून सेवन करा.
- दररोज ड्राय फ्रूट्स खाण्याची सवय लावा. ते अनेक पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असतात.
- फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स इत्यादी बियाण्यांचे त्वरित सेवन सुरू करा.
- गुळाचे सेवन करणे हा लोहाच्या कमतरतेवर मात करण्याचा देशी मार्ग आहे. रोज जेवणानंतर गूळाचे सेवन करा.