Top Recommended Stories

Jagannath Rath Yatra 2022 : जगन्नाथ मंदिरात दरवर्षी रथयात्रा का काढली जाते? जाणून घ्या अध्यात्मिक महत्त्व आणि यंदाचे वेळापत्रक

Jagannath Rath Yatra 2022 : ओडिशातील जगन्नाथ मंदिरापासून रथयात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेत देश-विदेशातील भाविक सहभागी होत भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतात. 

Published: June 30, 2022 9:56 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Jagannath Rath Yatra 2022
Jagannath Rath Yatra 2022

Jagannath Rath Yatra 2022 : भारतात जगन्नाथ रथयात्रेला (Jagannath Rath Yatra) विशेष महत्त्व आहे. या रथयात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरू होईल आणि 12 जुलै रोजी संपेल (Jagannath Yatra  schedule). हिंदू कालगणनेनुसार, दरवर्षी आषाढ महिन्याच्या (Aashadh Month) दुसऱ्या दिवशी, भगवान जगन्नाथ (Bhagvan Jagannath) आपला भाऊ बलराम (Balram) आणि बहीण सुभद्रा (Subhadra) यांच्यासोबत आपल्या मावशीच्या घरी जातात अशी पौराणिक मान्यता आहे. त्यानुसार ओडिशातील पुरी शहरातील जगन्नाथ मंदिरात (Shri Jagannath Temple Puri) दरवर्षी रथयात्रा मोठ्या उत्साहात काढली जाते. यात्रेदरम्यान जगन्नाथ मंदिरातून तीन सजवलेले रथ निघतात. समोर बलराजांचा रथ, मध्यभागी बहीण सुभद्राचा रथ आणि मागच्या बाजूला जगन्नाथ प्रभूंचा रथ असतो. जगन्नाथ रथ यात्रा जगभरात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील अनेक लोक या उत्सवात सहभागी होतात. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरतो.

रथयात्रा का काढली जाते?

हिंदू धर्मात सर्वच पुराणांना विशेष महत्त्व आहे. पद्म पुराणानुसार भगवान जगन्नाथाच्या बहिणीने एकदा नगरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मग जगन्नाथजी आणि बलभद्र आपली बहीण सुभद्राला घेऊन रथावर बसले आणि नगर दाखवायला निघाले. यादरम्यान ते गुंडीचा येथील मावशीच्या घरीही गेला आणि सात दिवस राहिले. तेव्हापासून येथे रथयात्रा काढण्याची परंपरा आहे. या रथयात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे.

You may like to read

हे आहे यंदाचे रथयात्रा वेळापत्रक

शुक्रवार 1 जुलै 2022- रथयात्रा प्रारंभ.

मंगळवार 5 जुलै- हेरा पंचमी म्हणजेच गुंडीचा मंदिरात पहिले पाच दिवस मुक्काम.

शुक्रवार 8 जुलै – संध्या दर्शन, या दिवशी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने 10 वर्षे श्री हरीची पूजा केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते.

शनिवार 9 जुलै – बहुदा यात्रा म्हणजेच या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि बहीण सुभद्रा हे घराकडे परततात.

रविवार 10 जुलै- सुनाबेसा  म्हणजे रथयात्रा जगन्नाथ मंदिरात परतल्यानंतर भगवान जगन्नाथ आपल्या भावंडांसोबत शाही रूप धारण करतात.

सोमवार 11 जुलै – आधार पान म्हणजेच आषाढ शुक्ल द्वादशीला दैवी रथांवर विशेष पेय अर्पण केले जाते. त्याला पान म्हणतात.

मंगळावर 12 जुलै- नीलाद्री बीज सोहळा. निलाद्री बीज हा जगन्नाथ यात्रेचा सर्वात रंजक विधी आहे.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.