Top Recommended Stories

janmashtami 2021 Special: श्रीकृष्णाचे आवडते वाद्य बासरी वाजवल्याने होतात आरोग्यदायी फायदे, कोणते ते घ्या जाणून!

देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Updated: August 28, 2021 4:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

flute benefits
flute benefits

मुंबई : यावर्षी 30 ऑगस्ट 2021 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shri Krishna Janmashtami) साजरी केली जाणार आहे. देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shri Krishna Janmashtami 2021) दरवर्षी श्रावण महिन्यात (Shrawan Months) वद्य अष्टमी या तिथीला साजरी केली जाते. फक्त भारतातच नाही तर परदेशातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Also Read:

श्रीकृष्ण जन्माष्टमीला (Krishna Janmashtami) दोन दिवस बाकी आहेत. भगवान श्रीकृष्णाचे आवडते वाद्य म्हणजे बासरी. बासरीचा (Basali) मधुर सूर कोणाच्याही मनाला मोहित करतो. अनेकांना बाजरी (Flute) वाजवायला देखील खूप आवडते. अशामध्ये तुम्हाला हे माहिती आहे का की बासरी वाजवल्याने अनेक आरोग्यदायी फायदे (Beneficial For Health) होतात. ते नेमके कोणते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

You may like to read

फुफ्फुस मजबूत होते (lungs become stronger) –

बासरी वाजवल्याने फुफ्फुस मजबूत होते. याशिवाय फुफ्फुसासंबंधित आजार देखील दूर होतात. यामुळे डायफ्राम मजबूत होतो.

स्मरणशक्ती वाढते (Increases memory) –

बासरी वाजवल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. बाजरी वाजवल्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीला बूस्ट मिळतो. यामुळे तुम्ही बऱ्याच काळापर्यंत गोष्टी लक्षात ठेवू शकता.

ताण कमी होतो (Stress is reduced) –

दररोज बासरी वाजवल्यामुळे कामाचा ताण कमी होतो. चिंता आणि त्रासांपासून मुक्तता होते. याशिवाय तुमचा मूडही सुधारतो.

मेंदूला आराम मिळतो (brain relaxes)-

बासरीमध्ये 9 छिद्र आहेत. हे एखाद्या व्यक्तीच्या 9 इंद्रियांवर परिणाम करतात. यातून निघणारे आवाज शांततेची, आनंदाची भावना देतात. ज्यामुळे व्यक्तीचे मन शांत राहते.

दरम्यान, बासरी हे भगवान श्रीकृष्णाचे आवडते वाद्य होते. भारतात हे वाद्य पुरातन काळापासून प्रचलीत आहे. बासरीला भारतीय संगीतातील वाद्यांमधील आद्य वाद्य मानले जाते. बासरी बांबूपासून तयार केली जाते. बासरी हे वेळुपासून तयार केलेले एक फुंकून वाजविण्याचे वाद्य आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: August 28, 2021 4:12 PM IST

Updated Date: August 28, 2021 4:30 PM IST