मुंबई : भारतीय स्वयंपाकघरामध्ये गरम मसाले वापरले जातात. गरम मसाल्यातील जिऱ्याचा (Jeera) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भाज्या आणि डाळीला फोडणी देताना त्यामध्ये जिरे (Cumin Seeds) टाकलेच जाते. जिऱ्यामुळे भाज्यांना चव येते पण त्याचसोबत जिरे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर (beneficial for health) आहे. याशिवाय जिरे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर (beneficial for skin) आहे. चेहऱ्यावर ग्लो (Glow) आणण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातो. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी जिरे खूप उपयोगी असल्याचे सांगितले जाते. आज आम्ही तुम्हाला जिऱ्यापासून फेस स्क्रब (Jeera Face Scrub) कशापद्धतीने तयार करायाचा हे सांगणार आहोत…Also Read - Coconut Milk Tea: नारळाच्या दूधाचा चहा कधी प्यायलाय?, नसेल प्यायला तर एकदा प्या होतील आरोग्यदायी फायदे!

जिऱ्याचा स्क्रब तयार करण्यासाठीची सामग्री (Ingredients for making cumin scrub)-

जिरे – दोन चमचे
साखर – अर्धा चमचा
मध – एक चमचा
बदाम तेल – एक चमचा
टी-ट्री ऑइल – एक थेंब Also Read - Almond oil For Dark Circles: डार्क सर्कलने आहात त्रस्त, मग बदामाच्या तेलाचा या 4 पद्धतीने करा वापर!

असा तयार करा जिऱ्याचा फेस स्क्रब (Prepare cumin face scrub like this) –

जिऱ्याचा फेस स्क्रब (Jeera Face Scrub) तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये बदामाचे तेल घ्या. त्यात मध आणि टी-ट्री ऑइल मिक्स करा. यानंतर त्यात जिरे आणि साखर (Jeer And Sugar) टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. असा तयार होईल फेस स्क्रब. तुम्ही हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच हात आणि पायांवर देखील लावू शकता. Also Read - janmashtami 2021 Special: श्रीकृष्णाचे आवडते वाद्य बासरी वाजवल्याने होतात आरोग्यदायी फायदे, कोणते ते घ्या जाणून!

जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे –

जिऱ्यात असलेल्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे आरोग्यासंबंधिच्या अनेक समस्या दूर होतील. जिरे शरीराच्या सर्व अवयवांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज आहारात जिऱ्याचा समावेश केल्यास त्याचे अनेक लाभदायक फायदे होतील. जिऱ्यामुळे पचनतंत्र (Improves digestion) सुधारते. पोटाच्या संबंधित समस्या दूर होतात. बद्धकोष्ठतेवर जिरे अत्यंत लाभदायक आहे. जिऱ्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग (Pimples, black spots) दूर होतात. जिऱ्यात व्हिटॉमिन ई (Vitamin E) भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. व्हिटॉमिन ई मुळे त्वचेवरील एजिंगचा (Aging of the skin) परिणाम कमी होतो.