Top Recommended Stories

Jhuralanvar Upay : झुरळांमुळे त्रस्त आहात? मग 'हे' करा पाच उपाय, झुरळ होतील घरातून हद्दपार

Jhuralanvar Upay : झुरळांपासून तुम्ही त्रस्त असाल तर काळजी करू नका ! आम्ही तुमच्यासाठी पाच असे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे झुरळ तुमच्या घरातून नक्कीच हद्दपार होतील.

Published: February 23, 2022 2:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Jhuralanvar Upay : झुरळांमुळे त्रस्त आहात? मग करा 'हे' पाच उपाय, झुरळ होतील घरातून हद्दपार

Jhuralanvar Upay : झुरळ हा असा जीव आहे जो प्रत्येक घरात आढळतो. अस्वच्छ जागेत राहणारा हा जीव त्याच्या सोबत अनेक रोगांना आमंत्रण देत असतो. घरातील किचन हे त्याचे आवडते ठिकाण आहे. खाद्य पदार्थ दूषित (Food Poisoning) करणारे असलेल्या झुरळाकडे पाहणे देखील काही जण पसंत करत नाही. अशा या झुरळांपासून तुम्ही त्रस्त असाल तर काळजी करू नका! आम्ही तुमच्यासाठी पाच असे घरगुती उपाय (Home Remedies) घेऊन आलो आहोत. ज्यामुळे झुरळ (Cockroach) तुमच्या घरातून नक्कीच हद्दपार होतील. चला तर मग बघूया काय आहे ते उपाय….

Also Read:

हे आहेत पाच घरगुती उपाय

लवंग(Clove)

लवंगमध्ये औषधी गुणधर्म असतात. लवंगाचा उपयोग तोंडाची दुर्गंधी, सर्दी-ताप दूर करण्यासाठी केला जातो. तसेच रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी देखील लवंगचा वापर केला जातो. अशा या बहूउपयोगी लवंगामुळे झुरळ देखील घरातून पळून जातात. यासाठी घरातील कानाकोपऱ्यात लवंगचे तुकडे ठेवा.

You may like to read

रॉकेल (kerosene Oil)

रॉकेलचा वास देखील झुरळांना आवडत नाही. त्यामुळे ते यापासून दूर पाळतात. घर पुसतांना पाण्यात काही प्रमाणात रॉकेल टाकावे. यामुळे झुरळासह इतर कीटक देकील घरातून निघून जातील. घराच्या कोपऱ्यामध्ये स्प्रेने रॉकेलचा फवारा मारावा. कारण कोपऱ्यात सर्वाधिक झुरळ आढळतात.

तमालपत्र (Bay Leaf)

स्वादिष्ट जेवण बनविण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. मात्र फारच कमी लोकांना माहीत असेल की तमालपत्र हे झुरळांना घरातून पळवून लावण्यासाठी रामबाण उपाय आहे. झुरळांना तमालपत्राचा गंध अजिबात सहन होत नाही. तमालपत्र बारीक कुटून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्यावे. यामुळे झुरळ पळून जातात.

बोरिक पावडर (Boric Powder)

बोरिक पावडर खाल्ल्याने झुरळ मरण पावतात. साखरमध्ये हे पावडर टाकून त्याच्या गोळ्या बनवून घ्याव्या. या गोळ्या अशा जागी ठेवा जिथे झुरळांचा वावर आहे. मात्र घरातील लहान मुलांपासून या गोळ्या लांब ठेवाव्यात.

घराची नियमित स्वच्छता (House Cleaning)

झुरळ अस्वच्छ जागेत राहतात आणि याच ठिकाणी ते अंडी देतात. त्यामुळे घरातील किचन, टॉयलेट आणि बाथरूमसह संपूर्ण घर स्वच्छ ठेवल्यास झुरळ कमी होतात. ज्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त आहे अशा भागात कायम स्वच्छता ठेवावी. अशा प्रकारे हे पाच घरगुती उपाय नियमित केल्यास तुमच्या घरातून झुरळ नक्कीच हद्दपार होतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 2:00 PM IST