Top Recommended Stories

जंक फूड खाणं सोडण्यासाठी करा मनुक्याचे सेवन - Junk Food Khane Sodanyasathi Kha Manuka

Kishmish For Junk Food Craving: आजची तरुण पिढी निरोगी अन्नापेक्षा जंक फूड खाणं जास्त पसंत करतात. अनेकांना जंक फूडची तलफ असते. पण हे जंक फूड खाल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात वजन वाढते.

Updated: March 31, 2022 4:34 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

kishmish
kishmish

Kishmish For Junk Food Craving: आजारपणाच्या काळात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अशा परिस्थितीत आपल्या आहाराजी काळजी घेणं आणि निरोगी अन्न खाणं फायदेशीर ठरतं. पण आजची तरुण पिढी निरोगी अन्नापेक्षा जंक फूड (Junk Food) खाणं जास्त पसंत करतात. अनेकांना जंक फूडची तलफ असते. पण हे जंक फूड खाल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात वजन वाढते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन करुन तुम्ही जंक फूड खाणं कमी करु शकाल. आम्ही ज्या बद्दल बोलत आहोत ते म्हणजे मनुका. मनुका (Raisin) खाऊन तुम्ही जंक फूड खाण्याची सवयी मोडू शकता आणि हेल्दी राहू शकता.

– जर तुम्हाला सतत जंक फूड खायला आवडत असेल आणि ही सवय मोडायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक मनुका आपल्या तोंडात टाकावा लागेल आणि आरामात तो खावा लागेल. यामुळे तुम्हाला लागलेली जंक फूडची तलफ हळूहळू कमी होऊन जाईल.

You may like to read

– मनुके (kishmish) खाताना अगदी आरामात खा आणि आपलं पूर्ण लक्ष त्याकडेच केंद्रीत करा. यामुळे अगदी 5 मिनिटांमध्ये तुमची जंक फूड खायची तलफ कमी होऊन जाईल.

– मनुके खाल्ल्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. लेप्टिन खर्मोजेनेसिस प्रक्रिया वाढवून फॅट कमी करण्याचे काम मनुका करतो.

– मनुक्याव्यतिरिक्त जंक फूडची तलफ कमी करण्यासाठी तुम्ही केळी आणि हिरवे सफरचंद (Green Apple) खावू शकता. नुकताच झालेल्या एका संशोधनात असे सांगण्यात आले होते की, ‘जर भूक लागल्यानंतर केळी आणि हिरव्या सफरचंदाचा वास जरी घेतला तरी देखील वजन वेगाने कमी होते.’

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.