(डिस्क्लेमर: लेखात दिलेला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे या विषयातील तज्ञांचे मत नाही)
Kadha For Cough: हिवाळ्यात सर्दीमुळं छातीत जमा झालाय कफ? प्या हा काढा, समस्या होईल दूर
हिवाळ्यात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. त्यामुळे सर्दी-खोकला अशा समस्या उद्भवतात. अनेकांच्या छातीत कफ जमा होतो. कफच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अनेकजण अनेक प्रकारच्या कफ सिरपचे सेवन करतात.

Kadha For Cough: हिवाळ्यात सामन्यत: अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. त्यामुळे सर्दी-खोकला अशा समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात अनेकांच्या छातीत कफ (Cough in chest) जमा होतो. त्यामुळे छातीत घट्टपणा जाणवतो. कफच्या समस्येपासून (cough problem) मुक्त होण्यासाठी अनेकजण अनेक प्रकारच्या कफ सिरपचे (Cough syrup) सेवन करतात. परंतु तरीही आराम मिळत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही काढ्यांबद्दल (kadha for cough) सांगणार आहोत. या काढ्याचे (Kadha) सेवन केल्यास तुमची कफची समस्या दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते काढे आणि ते कसे बनवावे….
आल्याचा काढा (Adrak Cha Kadha): एक ग्लास पाण्यात आलं, तुळस, काळी मिरी, ओवा, हळद घालून चांगलं उकळू द्या. चव वाढवण्यासाठी त्यात लिंबाचा रस आणि मध घाला. हा खाढा दिवसातून दोन वेळा प्यायल्याने शरीरात जमा झालेला कफ सहज निघून जातो.
ओव्याचा काढा (Ovya Cha Kadha) – ओव्याचा प्रभाव उष्ण असतो. त्यामुळे सर्दीमध्ये ते खूप फायदेशीर ठरते. यासाठी एक ग्लास पाणी उकळा. त्यात ओवा आणि गूळ घाला. अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहिल तोपर्यंत उकळवा. नंतर ते पाणी गाळून प्या. हा काढा दिवसातून दोन वेळा प्यायल्याने फुफ्फुसात जमा झालेला कफ बाहेर पडू लागतो.
दालचिनीचा काढा (Dalchini Cha Kadha) – कफ आणि खोकल्यासाठी दालचिनीचे सेवन खूप चांगले मानले जाते. यासाठी एका ग्लास पाण्यात दालचिनी पावडर, आलं, तुळस आणि काळी मिरी घाला. पाणी चांगलं उकळू द्या. यानंतर ते गाळून ग्लासमध्ये घ्या आणि त्यात चवीसाठी मध घाला. हा काढा पिल्यास कफ आणि खोकल्यापासून आराम मिळेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या