By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Kalashtami 2022: आज कालाष्टमी! जाणून घ्या व्रत, पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व
कालाष्टमी व्रताच्या दिवशी अनोखा योग जुळून आला आहे. सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग आणि रवी योग एकत्र आले आहेत. हे तिन्ही योग शुभ मानले जातात. या काळात पूजेला खूप महत्त्व आहे.

Kalashtami 2022: पंचांगानुसार दर महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमीला ‘कालाष्टमी’ व्रत केले जाते. सध्या फाल्गुन महिना (Phalguna Month) सुरू आहे. 23 फेब्रुवारीला कालाष्टमी आहे. या दिवशी महिला-पुरुष व्रत करतात. कालाष्टमी व्रताच्या दिवशी रुद्रावतार ‘काल भैरवा’ची (Kaal Bhairav) उपासना केली जाते. ब्रह्मदेवाचे डोके क्रोधाने जळू लागले होते. तेव्हा भगवान शिवशंकराचा (Lord Shankar) अंश असलेल्या काल भैरवाचा जन्म झाला. काल भैरवाने ब्रह्मदेवाचे जळणारे मस्तक कापले. काल भैरवांवर ब्रह्मदेवाच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या दोषातून कालभैरवाची मुक्तता विश्वनाथाची नगरी असलेल्या काशीत झाली. चला तर मग जाणून घेऊया कालाष्टमीचे व्रताचा मुहूर्त (Puja Muhurat) आणि पूजेच्या मुहूर्त…
कालाष्टमी व्रत 2022 तिथी आणि मुहूर्त…
हिंदु कालदर्शिकेनुसार, कालाष्टमीचे व्रत बुधवार, 23 फेब्रुवारीला केले जाणार आहे. बुधवारी सायकांळी 04 वाजून 56 मिनिटांला कालाष्टमीला प्रारंभ होत असून पुढील दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारीला दुपारी 03 वाजून 03 मिनिटांला कालाष्टमी समाप्त होत आहे.
तीन योगांचा संगम…
कालाष्टमी व्रताच्या दिवशी अनोखा योग जुळून आला आहे. सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग आणि रवी योग एकत्र आले आहेत. हे तिन्ही योग शुभ मानले जातात. या काळात पूजेला खूप महत्त्व आहे. कालाष्टमीला सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योगाला दुपारी 02 वाजून 41 मिनिटांला प्रारंभ होत आहे. विशेष म्हणजे हा योग 24 फेब्रुवारीला सकाळी 06 वाजून 52 मिनिटांपर्यंत राहाणार आहे. तर कालाष्टमीच्या दिवशी पहाटे रवी योग बनत आहे. सकाळी 06 वाजून 52 मिनिटे तर दुपारी 02 वाजून 41 मिनिटांपर्यंत हा योग राहाणार आहे.
Trending Now
कालाष्टमीच्या व्रताचे महत्त्व..
कालभैरव हा भगवान शिवाचा एक अंश आहे. तो तंत्र-मंत्रांचा देव आहे. त्याची उपासना केल्याने भय आणि दुःख दूर होतात. त्याच्या कृपेने अकाली मृत्यूचे भयही नाहीसे होते, असे म्हटले जाते. रोग आणि दोष दूर होतात. काल भैरव आपली संकटांपासून रक्षण करतो. कालभैरवाची उपासना केल्याने नकारात्मकता दूर होते.
(Disclaimer:या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या