Top Recommended Stories

Kalashtami 2022: आज माघ महिन्यातील कालाष्टमी; जाणून घ्या... काळभैरव पूजेचे महत्त्व

शास्त्रानुसार या भगवान काळभैरव यांचे विधीवत पूजा व उपवास केल्यास भगवान शंकराचा कृपाशिर्वाद प्राप्त होत व्यक्ती भयमुक्त होऊन संकटापासून मुक्ती होते.

Published: January 25, 2022 10:55 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Kalashtami 2022: आज माघ महिन्यातील कालाष्टमी; जाणून घ्या... काळभैरव पूजेचे महत्त्व

Kalashtami 2022: पौराणिक मान्यतेनुसार भगवान भैरवनाथाची (bhairavnatha) उपासना केल्यास व्यक्ती भयमुक्त होतो. यासह व्यक्तीच्या जीवनातील समस्यांचा नाश होऊन सुख-शांती प्राप्त होते. काळभैरव भगवान (Kalabhairav pooja) शंकराचे (Lord Shiv Shankar) रूप असून या रुद्र रूपाची पूजा दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या (Krishna paksha) अष्टमीला (Ashtami) केली जाते. या वर्षांचा पहिले कालाष्टमी व्रत आज, 25 जानेवारीला आहे. आज भगवान शंकराचे रौद्र रूप काळभैरवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. भगवान कालभैरव यांना मंत्र-तंत्र देवता देखील मानले जाते.

Also Read:

असे आहे पौराणिक महत्त्व

कालाष्टमीच्या (Kalashtami) दिवशी भगवान काळभैरव यांची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती दूर राहतात. तसेच व्यक्तीवर तंत्र-मंत्राचा प्रभाव पडत नाही. यासह व्यक्ती भयमुक्त होतो. मान्यतेनुसार काळभैरव भगवानाची उत्पत्ती भगवान शंकरापासून झाली आहे. भगवान शंकराचे दोन रूप मानले जातात. एक बटुकभैरव (Batukbhairav) दुसरे काळभैरव (Kalbhairav). बटुकभैरव रूप हे सौम्य मानले गेले आहे. तर काळभैरव रूप रौद्र आहे. मान्यतेनुसार कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकराने पापींचा नाश केला होता. यासाठी त्यांनी रौद्र रूप धारण केले होते. मासिक कालाष्टमीच्या दिवशी भगवान काळभैरव यांची पूजा रात्रीच्या वेळेस केली जाते. दरम्यान, रात्रीच्या वेळेस चंद्राला जल अर्पण केल्या नंतरचा उपवास सोडला जातो.

You may like to read

शास्त्रानुसार या भगवान काळभैरव यांचे विधीवत पूजा व उपवास केल्यास भगवान शंकराचा कृपाशिर्वाद प्राप्त होत व्यक्ती भयमुक्त होऊन संकटापासून मुक्ती होते.

वर्षात 12 वेळा कालाष्टमी व्रत

वर्षात एकूण 12 वेळा कालाष्टमी व्रत पडतात. सध्या माघ महिना सुरु आहे. माघ महिन्याला मान्यतेनुसार खूप पवित्र माह मानले जाते. कालाष्टमीला काला अष्टमी म्हणून देखील ओळखले जाते. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालाष्टमी पूजन केले जाते. काळभैरव भगवान व्रत केल्याने व्यक्ती भयमुक्त होत जीवनातून अडचणींचा नाश होतो.

अशी करा पूजाविधी…

– या दिवशी सकाळी लवकर उठून व्रत संकल्प घ्यावा.
– मंदिरात जाऊन भगवान काळभैरव, भगवान शंकर व माता पार्वतीची पूजा करावी.
– भगवान कालभैरव यांची पूजा रात्रीच्या वेळी केली जाते. त्यामुळे रात्री पुन्हा भगवान काळभैरव यांची पूजा करावी.
– रात्री धूप, दीप, काळे तीळ, उडीद आणि मोहरीच्या तेलाने विधिवत पूजन करून आरती करावी.
– नैवैद्यामध्ये गुलगुले, हलवा किंवा जिलेबी द्यावी.
– पूजेदरम्यान भैरव चालिसाचे पठण करावे.
– पूजनानंतर नैवद्यातील काही पदार्थ काळ्या कुत्र्याला खाऊ घालावे. कुत्र्याला गोड पोळी खाऊ घालावी. कुत्र्याला भगवान काळभैरव यांचा आभास मनाला जातो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 25, 2022 10:55 AM IST