Top Recommended Stories

काळे चणे आरोग्यासाठी फायदेशीर - Kale Chane Arogyasathi Fayadeshir

Kale Chane Arogyasathi Fayadeshir : चणे आरोग्यासाठी चांगले असून नियमित चणे खात जा असं तुमच्या आजी देखील तुम्हाला सांगत असतील. काळे चणे खाल्ल्याने शरीराला खूप शक्ती मिळते आणि रोगापासून आपल्या शरीराचे संरक्षण होते.

Published: March 25, 2022 6:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

black chickpeas benifits
black chickpeas benifits

Kale Chane Arogyasathi Fayadeshir : हरभरे म्हणजेच चणे (Chickpeas) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये चण्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. काही जण चण्याची भाजी तयार करात. तर काही जण उकडून चणे खातात किंवा मोड आलेले चणे खातात. अशामध्ये काळे चणे (Black Chickpeas) हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत. काळ्या चण्यातून आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट (Carbohydrates), प्रोटीन ( proteins), फायबर ( fiber), कॅल्शिअम (calcium), लोह (iron) आणि खनीज (minerals) हे मोठ्याप्रमाणात मिळतात. चणे आरोग्यासाठी चांगले असून नियमित चणे खात जा असं तुमच्या आजी देखील तुम्हाला सांगत असतील. काळे चणे खाल्ल्याने शरीराला खूप शक्ती मिळते आणि रोगापासून आपल्या शरीराचे संरक्षण होते. आज आम्ही तुम्हाला काळे चणे खाण्याचे फायदे (black chickpeas benifits) आणि त्यामुळे आपल्या शरीराला ताकद कशा पद्धतीने मिळते हे सांगणार आहोत…

काळ्या चण्याचे फायदे (Black Chickpeas Benefits) –

– काळ्या चण्यामध्ये लोह मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळे काळे चणे खाल्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन (Hemoglobin) वाढते म्हणजेच शरीरातील रक्ताची कमतरता (Anemia) दूर होते. तसंच अशक्तपणा कमी होतो.

You may like to read

– काळे चणे डायबिटीच्या रुग्णांसाठी (diabetic patients) खूपच फायदेशीर आहे. चण्यामध्ये मोठ्याप्रमाणात फायबर (Fiber) असते. हे फायबर आपल्या रक्तातील शुगर लेव्हल कंट्रोल (Sugar level control) करते.

– काळ्या चण्यामध्ये फायबर असते त्यामुळे ते पचन होण्यासाठी सोपे असतात. यामुळे तुमची पाचक प्रणाली निरोगी (Digestive system healthy) राहते. तसंच या चण्यांमुळे बद्धकोष्टतेची समस्या (Problems with constipation) होत नाही.

– काळ्या चण्यामध्ये अँटीऑक्सिडेंट (Antioxidants) असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी (heart health) खूप महत्वाचे असतात.

– जर तुम्हाला त्वचेसंबंधित काही समस्या (skin problems) असतील तर त्या काळे चणे खाल्ल्यामुळे दूर होऊ शकतात. मोड आलेले चणे खाल्ल्यामुळे त्वेचेवर चमक येते.

– चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन ( proteins) असते. त्यामुळे आपल्या शरीरात नवीन पेशी तयार होतात. तसंच स्नायूंच्या विकासासाठी देखील ते मदत करतात.

– केसासाठी काळे चणे खूप फायदेशीर आहेत. त्यात व्हिटॅमिन -ए, ई मोठ्याप्रमाणात असते. केस कुमकुवत होणे, केस गळणे यासारख्या समस्या (Hair Problem) दूर होतील.

– डोळ्यांसाठी (Eyes) चणे फायदेशीर आहेत. चण्यामध्ये कॅरोटीन घटक आहे. कॅरोटीनमुळे डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. तसंच डोळ्यांची निरोगी क्षमता टिकून राहते.

– जर लठ्ठपणाची समस्या (problem of obesity) दूर करायची असेल तर तुम्ही चणे खा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी चणे फायदेशीर आहेत. चण्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स (Glycemic index) असते जे भूक कमी करुन वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.