
Don’t Miss Out on the Latest Updates.
Subscribe to Our Newsletter Today!
Kandyache Tel Kesasathi Fayadeshir : प्रत्येक जण केस गळतीच्या (Hair fall) समस्यांमुळे त्रस्त असतो. पण कधी कधी केस गळतीला आपली जीवशैली (Lifestyle) आणि आहार (Diet) देखील मोठे कारण असू शकते. हार्मोन्स बदलामुळे (hormonal changes) काहीवेळा केस गळण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टींचा वापर करुन केस गळती रोखू शकता. केस गळती थांबवण्यासाठी कांद्याचे तेल खूप फायदेशीर (onion oil benefits for hairs) ठरु शकते. कांद्याचे तेल लावल्यामुळे केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते. आज आम्ही तुम्हाला घरीच कांद्याचे तेल (onion oil) कसे तयार करायचे, त्याचा नेमका उपयोग कसा करायाचा तसंच त्याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहोत…
– सर्वात आधी तुम्ही कांद्याचा रस काढून घ्या. कांद्याचा रस काढण्यासाठी तुम्ही मिक्सर ग्राइंडरचा वापर करु शकता.
– एका कढईमध्ये नारळाचे तेल घ्या आणि त्यामध्ये कांद्याचा रस मिक्स करा.
– तेलाला चांगली उकळी येऊ द्या.
– तेल थंड झाल्यानंतर ते गाळणीने गाळून घ्या.
– हे तेल तुम्ही एका बाटलीमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता.
केसाला कांद्याचे तेल लावण्यापूर्वी त्याला थोडेसे गरम करुन घ्या. त्यानंतर केसाच्या मुळांवर कांद्याचे तेल व्यवस्थित लावा. हलक्या हाताने मसाज करा. एक तास हे तेल केसावर असेच ठेवा. त्यानंतर शॅम्प्यूने केस स्वच्छ धुवा.
– कांद्याचे तेल केसाला लावल्यामुळे केस चमकदार होतात. तुम्ही याचा वापर करताना त्यामध्ये नारळाचे तेल (Coconut oil) आणि ऑलिव्ह ऑईल (olive oil) मिक्स करु शकता.
– तुम्हाला लांबसडक केस (Long hair) हवे असतली तर तुम्ही कांद्याच्या तेलाचा वापर करा. केसाच्या वाढीसाठी कांद्याचे तेल खूपच फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे.
– केसामध्ये बॅक्टेरियामुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे (Infections caused by bacteria) अनेक जण केस गळण्याच्या समस्येचा सामना करतात. अशा व्यक्तींनी नियमितपणे केसाला कांद्याचे तेल लावले पाहिजे.
– कांद्याचे तेल नियमितपणे केसाला लावल्यामुळे आपल्या टाळूला भरपूर प्रमाणात पोषण मिळते. हे तेल फक्त ब्लड सर्कुलेशन (Blood circulation) करत नाही तर केसाला जाड आणि मजबूत करण्यासाठी ( thick and strong hair) देखील मदत करते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
Enroll for our free updates