मुंबई : कारलं (Bitter melon)आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. कारल्याच्या कडू चवमुळंच ते आरोग्यासाठी खूप (karlyache fayde)उपयुक्त ठरतं. मात्र, तुम्हाला हे ठाऊक आहे का कारल्याचा फायदा केवळ आरोग्यासाठीच होत नाही, तर त्याच्या वापरामुळं त्वचा देखील चमकदार होत (Karle Beauty Tips) असते. कारल्याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरुम आणि डाग यासारख्या समस्यापासून सुटका मिळू (karlyache fayde) शकते आणि तुमच्या चेहऱ्याचं सौदर्य (Beauty Tips) वाढू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात त्वचेसाठी कारल्याचा वापर कसा करावा..Also Read - Raw Milk Skin Care Tips: चेहर्‍यावर अशा प्रकारे लावा कच्चे दूध, मुलायम होईल त्वचा

कारल्यात असतात हे घटक

कारल्यामध्ये कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, व्हिटामिन ए, व्हिटामिन-सी, कॅरोटिन, ग्लूकोसाइडस, सोपोनिन आणि अलकलाइड हे सर्व घटक असतात. हे सर्व घटकांमुळं कारलं आरोग्यासाठी आतिशय उपयुक्त बनते. यामुळं शरीराची रोग प्रतिकार शक्ती (Immunity) वाढतेच शिवाय शरीर निरोगी (Healthy body) राहण्यास मदत होते. याशिवाय कारल्याचा वापर त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी (Bitter melon Beauty Tips) देखील होतो. Also Read - Mango Hair Pack: आंब्याचा हेअर पॅक वापरुन मिळवा सुंदर आणि दाट केस, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत!

डाग आणि मुरुम दूर करण्यासाठी : एक कारलं आणि लिंबाचे दहा पानं बारीक करून त्याची पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये अर्धा चमचा हळद घाला. हा पॅक आपल्या चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटांसाठी तो पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर तसाच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. Also Read - चिमूटभर मीठाने दूर होतील त्वचेशीसंबंधी सर्व समस्या, असा करायचा वापर!

तेजस्वी त्वचेसाठी : एक कारलं आणि संत्र्याची वाळलेली साल एकत्र बारीक वाटून घ्या. त्यात एक चमचा मुलतानी मातीचं पावडर घाला आणि अर्धा चमचा बेसन पीठ घाला. हे सर्व घटक मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 10 मिनिटे स्क्रब मालिश करा. त्यानंतर 15 मिनिटे तसंच ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी : एक मोठा चमचा कारल्याचा रस घ्या. याला दोन मोठे चमचे दही घेऊन त्यात व्यवस्थीत मिसळा. तसंच, अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यातील अर्धा भाग या मिश्रणात मिसळा. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून चेहरा आणि मानेवर लावा.