Ketu Gochar 2022: केतू ग्रह दीड वर्षे तूळ राशीत राहणार, 'या' तीन राशींना होईल धन लाभ!
Ketu Gochar 2022 : केतू ग्रहाने (Ketu) 12 एप्रिल 2022 रोजी तूळ राशीत (Libra) प्रवेश केला आहे. केतू ग्रह तूळ राशीत 2023 पर्यंत म्हणजेच दीड वर्षे राहणार आहे. केतूच्या या राशी परिवर्तनाचा सर्वच राशींवर प्रभाव पडेल. मात्र तीन राशी अशा आहेत ज्यांना केतुचे हे राशी परिवर्तन फलदायी ठरणार आहे.

Ketu Gochar 2022: ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात ग्रह-नक्षत्रांचा (Grah-Nakshatra) विशेष प्रभाव असतो. खरंतर ग्रहांची स्थिती वाईट असल्यास शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतात. यामुळे जीवनात अनेक चढ-उतार देखील येतात. कुंडलीतील (Kundali) केतू ग्रहाची स्थिती चांगली नसल्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. केतू ग्रहाने 12 एप्रिल 2022 रोजी तूळ राशीत (Ketu Gochar 2022) प्रवेश केला आहे. हा ग्रह तूळ राशीत 2023 पर्यंत म्हणजेच दीड वर्षे राहणार आहे. केतूच्या या राशी परिवर्तनाचा सर्वच राशीवर प्रभाव पडेल. मात्र तीन राशी अशा आहेत ज्यांना हे राशी परिवर्तन फलदायी ठरणार आहे. या काळात या राशींच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी…
Also Read:
मकर (Capricorn)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी केतू ग्रहाचे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. कारण केतू ग्रह मकर राशीच्या अकराव्या भावात भ्रमण करीत आहे. अकराव्या भावाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. केतूच्या संक्रमणादरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना अनेक नवीन स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. यासह व्यवसायात नफा मिळण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तसेच व्यवसायात नवीन करार पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात.
कर्क (Cancer)
केतू ग्रह कर्क राशीच्या चौथ्या भावात भ्रमण करत आहे. या स्थानाला सुखाचे स्थान म्हटले जाते. त्यामुळे केतुचे या भावातील भ्रमण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. विविध भाषा शिकण्याची आवड तसेच अनुवादक म्हणून करियर करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. यावेळी नवीन नोकरीची संधी मिळू शकते. केतू संक्रमण काळात तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख देखील मिळू शकते.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीत केतू ग्रह नवव्या भावात भ्रमण करत आहे. हा भाव भाग्य तसेच परदेश प्रवासाचे स्थान म्हणून ओळखले जातो. त्यामुळे या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ लाभेल. कुंभ राशीचे लोक जे काम हातात घेतील त्यात त्यांना यश मिळेल. या काळात व्यवसायिक कामानिमित्त बाहेरगावी प्रवास होऊ शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळेल. यासह कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या