Top Recommended Stories

मनुक्याचा फेसपॅके चेहऱ्यासाठी फायदेशीर - Manukyacha Face Pack Cheharyasathi Fayadeshir

Kishmish Face Pack : मनुके आपल्या त्वचेसाठी कसे फायदेशीर आहेत आणि त्याचा फेसपॅक कसा तयार करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत...

Updated: February 24, 2022 10:25 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Kishmish
किशमिश और दूध कैसे खाएं?

Kishmish Face Pack : ड्रायफ्रूट्समधील (dried fruits) मनुके खायला सर्वांना आवडतात. इतर ड्रायफ्रूट्सप्रमाणे मनुके (Kishmish) देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मनुके द्राक्ष (Grapes) सुकवून तयार केले जातात. मनुके न्यूट्रिशन आणि आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial For Health) मानले जातात. आरोग्यासोबत मनुके आपल्या त्वचेसाठी (Beneficial For Skin) देखील खूपच फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. आज आपण मनुके आपल्या त्वचेसाठी कसे फायदेशीर आहेत आणि त्याचा फेसपॅक (Kishmish Face Pack) कसा तयार करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत…

मनुक्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारी सामग्री –

– मनुके
– टी ट्री ऑइल
– लिंबाचा रस
– कोरफड
– मुलतानी माती

You may like to read

असा तयार करा मनुक्याचा फेसपॅक –

– मनुक्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये सर्व सामग्री टाका आणि व्यवस्थित मिक्स करा.
– ही सर्व सामग्री मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्या. जर तुम्हाला ही पेस्ट खूपच जाडसर वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही गुलाब पाणी टाका. असा फेसपॅक तयार होईल.
– हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. कमीत कमी 25 मिनिटं हा फेसपॅक चेहऱ्यावर असाच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

कोरड्या त्वचेसाठी मनुक्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी सामग्री –

– मनुके
– दही
– काकडीचा रस
– दूध
– डाळीचे पीठ
– गुलाबाची पानं

असा तयार करा मनुक्याचा फेसपॅक –

– हा फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वात आधी ही सर्व सामग्री मिक्समध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करुन घ्या. असा तयार होईल फेसपॅक.
– आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि किमान 20 मिनिटं चेहरा असाच ठेवा. चेहरा सुकल्यानंतर गुलाब पाणी आणि साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
– आठवड्यातून एकदा तरी हा फेसपॅक लावा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.