
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Health tips: कोरोना काळात आपल्याला इम्यूनिटी (Immunity )किती महत्त्वाची असते हे कळाले आहे. आजच्या काळात निरोगी राहण्यासोबतच इम्यूनिटीची देखील खूप काळजी घ्यावी लागते. इम्यूनिटी चांगली असणे किती महत्त्वाचे असते हे लोकांना आता समजले आहे. त्यामुळेच इम्यूनिटी वाढवण्यासाठी प्रत्येक जण विशेष लक्ष देत आहे. मात्र अनेक लोक याविषयी गांभिर्याने विचार करत नाहीत. आपली इम्यूनिटी कमी होतेय हेच काहींच्या लक्षात येत नाही. तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचे सर्वात मोठे लक्षण (Symptoms) म्हणजे त्या व्यक्तीला कोणताही संसर्ग किंवा आजार सहज होतो. म्हणजेच एखाद्याला नेहमी खोकला आणि सर्दीचा त्रास असतो.
औषध घेतल्याशिवाय जर तुमचा सर्दी-खोकला किंवा ताप बरी होत नसेल तर तुमची इम्यूनिटी कमकुवत होण्यास सुरुवात झाल्याचे हे लक्षण आहे. आपले खाद्य पदार्थ देखील इम्यूनिटी कमकुवत (weak immunity)करते. आपण काय खातोय याची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. असे अनेक लोक आहेत जे वारंवार इम्यूनिटी कमकुवत करणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात. यामुळे त्यांची इम्यूनिटी ही कमकुवत होऊ लागते. तर मग आता इम्यूनिटी कमकुवत करणारे पदार्थ कोणते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
ज्या पदार्थांमध्ये जास्त फॅट असते, ते इम्यूनिटी आणि पांढऱ्या रक्त पेशींना काम करण्यापासून थांबवतात किंवा त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. इम्यूनिटी कमकुवत झाल्यामुळे तुम्ही आजारी पडता, त्यामुळे जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा.
फास्ट फूड हे शरीरासाठी प्रत्येक प्रकारे हानिकारक मानले जाते, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला नुकसान होण्याचा धोका वाढतो.
कोरोना रुग्णांनी आता पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत तुमची इम्यूनिटी मजबूत असणे गरजेचे आहे. दुसरीकडे, तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा अल्कोहोलचे सेवन करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्यांचे सेवन केल्याने तुमची इम्यूनिटी कमकुवत होते.
फ्रोझन फूड्स, चिप्स किंवा इतर फूड्स ज्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, ते देखील इम्यूनिटी कमजोर करु शकतात. विशेषज्ञांनुसार हे शरीराची इम्यूनिटी खराब करण्यास जबाबदार असतात. मीठ हे इम्यूनिटी खराब करते यासोबतच आतड्यांवर देखील याचा परिणाम होतो.
जास्त साखरेचे सेवन करणे देखील इम्यूनिटीला नुकसान पोहोचवते. रिपोर्टनुसार, शुगर लेव्हल जास्त असल्याने आतड्यांच्या क्षमतेवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे व्हायरसविषयी शरीर जास्त सेंसिटिव्ह बनते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या