Top Recommended Stories

कोथिंबीरचा फेसपॅकचे चेहऱ्यासाठी फायदे - Kothimbirichya Facepackche Cheharyasathi Fayade

Coriander Face Pack Benefits : जेवणाची चव वाढविण्यासोबतच चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी देखील कोथिंबीरचा वापर केला जातो. चेहऱ्यावर कोथिंबीर लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरुम कमी होण्यास मदत होते.

Updated: February 21, 2022 5:49 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Green Coriander
Green Coriander

Coriander Face Pack Benefits : हिरवी कोथिंबीर (Green Coriander) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोथिंबीर चविला खूपच स्वादिष्ट असते. जेवणामध्ये कोथिंबीरचा वापर केल्यामुळे खूपच चांगली चव येते. पण तुम्हाला हे माहिती आहे का जेवणाची चव वाढविण्यासोबतच चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी देखील कोथिंबीरचा वापर केला जातो. चेहऱ्यावर कोथिंबीर लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरुम कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही तर चेहऱ्याला सतत कोथिंबीर लावल्यामुळे तुमची मुरुमाची समस्या कायमची दूर होऊ शकते. आज आपण हिरव्या कोथिंबीरचा फेसपॅक (Coriander Face Pack) कसा तयार करायचा हे जाणून घेणार आहोत.

Also Read:

फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारी सामाग्री –

– ताजी हिरवी कोथिंबीर
– एक मोठा चमचा दही
– एक चमचा बेसन पीठ

You may like to read

फेसपॅक तयार करण्याची कृती –

फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वात आधी ताज्या कोथिंबीरीच्या पानांची बारीक पेस्ट करुन घ्या. त्यामध्ये दही आणि बेसन पीठ मिक्स करा. हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. २० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.

कोथिंबीरच्या फेसपॅकचे फायदे –

– कोथिंबीरच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), अँटी- बॅक्टेरियल (anti-bacterial), अँटी-ऑक्सिडेंट (anti-oxidant ) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (anti-inflammatory) गुणधर्म असतात. हिरवी कोथिंबीर सनबर्नने होणारे नुकसान थांबवून त्वेचेला ओलसर ठेवण्यास मदत करते.

– मधुमेह (Diabetes) असणाऱ्या रुग्णांसाठी कोथिंबीर खूपच फायदेशीर आहे. कोथिंबीर रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

– कोथिंबीर पाचन तंत्रासाठी देखील खूपच फायदेशीर आहे. यकृताची ( liver) सक्रियता वाढवण्यासाठी कोथिंबीर मदत करते.

– मासिक पाळीशी (menstruation cycle) संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी हिरवी कोथिंबीर खुप मदत करते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या