Krishna Janmashtami 2021: जन्माष्टमीला श्रीकृष्णाची अशी करा पूजा, येथे पाहा पूजेचं साहित्य
. जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, श्रीकृष्णाचा जन्म दिवस. (Lord Shri Krishna) श्रावण महिन्यात वाद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर (Rohini Nakshatra) मथुरेत (Mathura) कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला.

यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2021) 30 ऑगस्ट, सोमवारी साजरी करण्यात येणार आहे. 29 ऑगस्टला रात्री 11 वाजून 25 मिनिटांला अष्टमीला प्रारंभ होईल तर 30 ऑगस्टला रात्री 1 वाजून 59 मिनिटांला समाप्त होईल. जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, श्रीकृष्णाचा जन्म दिवस. (Lord Shri Krishna) श्रावण महिन्यात वाद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर (Rohini Nakshatra) मथुरेत (Mathura) कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Also Read:
श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत केलं जातं. विशेष पूजा-अर्चना केली जाते. तुम्ही देखील जन्माष्टमीला (Janmashtami 2021) व्रत करणाचा विचार करत असाल तर आम्ही आपल्यासाठी पूजेच्या साहित्याची यादी (Janmashtami Puja Ki List) घेवून आलो आहे.
पूजेच्या साहित्याची यादी…
– बालगोपाळासाठी झोपाळा.
– बालगोपाळाची तांब्याची मूर्ती.
– बासरी
– बालगोपाळाचे वस्त्र.
– श्रृंगारा करण्यासाठी दागिने.
– बालगोपाळाचा झोपाळा सजवण्यासाठी फूलं.
– तुळशीची पाने.
– चंदन.
– कूमकूम.
– अक्षता.
– तुरटी.
– लोणी.
– गंगाजल.
– धूप बत्ती.
– कपूर.
– केसर.
– शेंदूर.
– सुपारी.
– नागेलची पानं.
– पुष्पमाळा.
– कमळफूल.
– तुळसीमाळा
– आख्खे धणे.
– लाल कापड.
– केळीचे खांब.
– केळीचे पानं.
– मध.
– साखर.
– साजूक तूप.
– दही
– दूध
श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजन विधी
शुभ मुहूर्तावर बाळकृष्णाचा दुग्धाभिषेक करावा. दही, तूप, मधाची आंघोळ घालावी नंतर गंगाजलानं स्नान करावा. नंतर या मिश्रणाचं पंचामृत करावं. स्नान आटोपल्यानंतर बाळगोपालाचा श्रृगांर करावा. वस्त्र परिधान करावे. आभुषणे चढवावी. भगवान कृष्णाचे भजन म्हणावे. कपाळावर चंदन आणि अक्षताचा टिळा लावावा. लोणी-पंचामृत आणि तुळसी पत्राचा नैवेद्य दाखवावा. बाळकृष्णाला झोपाळ्यात बसवावे,भजन-कीर्तन करावे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या