मुंबई: मोर पंखांना (Mor Pankh) हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. मोर पंख केवळ श्री कृष्णालाच प्रिय नाही तर माता सरस्वती, माता लक्ष्मी, इंद्रदेव, भगवान कार्तिकेय आणि श्री गणेश यांना देखील प्रिय आहेत. मोराचे पंख श्री कृष्णाला खूप प्रिय आहेत. श्री कृष्णाच्या डोक्यावरील मुकूटात नेहमी मोराचे पंख लावलेले असते. या वर्षी जन्माष्टमी (Krushna Janmashtami 2021 ) 30 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रासोबतच वास्तुशास्त्रातही (Vaastu Shastra) मोराच्या पंखांना विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला मोराच्या पंखांचे काही उपाय (Mor Pankh Upay) सांगणार आहोत. (Krushna Janmashtami 2021 Mor Pankh Upay: on the Day of Janmashtami do these upay of Mor Pankh Peacock Feathers Krushna Janmashtami 2021)Also Read - Janmashtami 2021: जन्माष्टमीला राशीनुसार श्री कृष्णाला अर्पण करा वस्त्र आणि नैवद्य, आयुष्यात येईल सुख आणि आनंद

वास्तु दोष (Architectural defects) : जर घरात कोणत्याही प्रकारचा वास्तु दोष असेल तर 8 मोर पंख खालून पांढऱ्या धाग्याने बांधावे आणि ओम सोमाय नम: या मंत्राचा जप करा. यामुळे वास्तू दोष दूर होतो असे मानले जाते. Also Read - Krushna Janmashtami 2021: आर्थिक समस्या आणि कर्जापासून मुक्त होण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी करा हे चार उपाय

वाईट शक्तीपासून सुटका (Get rid of bad spirits) : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पंख लावल्याने घरात कोणतीही वाईट नजर आणि शक्ती प्रवेश करू शकत नाही, अशी मान्यता आहे.

जिद्दी मुलांसाठी (Stubborn children) : तुमचे मुल जर खूप जिद्दी असेल तर त्या मोराच्या पंखापासून बनवलेल्या पंख्याने हवा द्या किंवा आपल्या घरातील पंख्यावरच मोरांचे पंख चिकटवा.

एकाग्रता वाढवण्यासाठी (Increase concentration) : तुमचे मुल जर अभ्यासाकडे लक्ष देत नसेल तर मुलाच्या पुस्तकात मोराचे पंख ठेवा. यामुळे एकाग्रता वाढते.