Loung Water Benefits In Winter: हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचं पाणी, आरोग्यासंबंधीत या समास्या होतील दूर
Loung Water Benefits In Winter: हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचं पाणी, आरोग्यासंबंधीत या समास्या होतील दूर
भारतीय जेवणात विविध औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचा वापर केला जातो. त्यातील एक म्हणजे लवंग. लवंग हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा मसाला आहे. चवीसोबतच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते.
Loung Water Benefits In Winter Drink clove water before going to bed at night in winter, these health related problems will go away
Loung Water Benefits In Winter: भारतीय जेवणात विविध औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचा वापर केला जातो. त्यातील एक म्हणजे लवंग. लवंग (Loung) हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा मसाला आहे. चवीसोबतच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. लवंगात (Clove ) व्हिटॅमिन सी, फायबर, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हिवाळ्यात लवंगाचे पाणी पिणे ( Loung pani pinyache fayde) आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया लवंगाचे पाणी कसे (Loung panyache fayde) बनवायचे आणि त्याचे फायदे…
जळजळ कमी होते : लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे तुम्हाला ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते. ( Drink clove water before going to bed at night in winter, these health related problems will go away)
You may like to read
संसर्गापासून बचाव करते : लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ते तुम्हाला इंफेक्शन आणि हानिकारक बॅक्टेरियापासून वाचवू शकतात.
मधुमेहासाठी फायदेशीर : मधुमेहाच्या रुग्णांनी लवंगाचे पाणी अवश्य सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
खोकला आणि सर्दीपासून मिळतो आराम : लवंगाचे पाणी खोकला, सर्दी, व्हायरल इन्फेक्शन, ब्राँकायटिस, सायनस आणि दमा यापासून मुक्त होण्यास मदत करते.
दातदुखीत फायदेशीर : कोमट पाण्यासोबत लवंग घेतल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. दात दुखत असेल तर आराम मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या दातांवर लवंग देखील ठेवू शकता.
लवंगाचे पाणी कसे बनवायचे?
रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 लवंगा एक ग्लास पाण्यात टाकून चांगल्या प्रकारे उकळा. 5 मिनिटे उकळल्यानंतर थोडं थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यानंतर प्या.
(डिस्क्लेमर : लेखात दिलला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ज्ञांचे मत नाही)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर
लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा
इतरही ताज्या बातम्या
More Stories
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.