Magh Month Significance : माघ महिन्यात घरात येते सुख आणि समृद्धी, जाणून घ्या काय आहे महत्त्व
हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. माघ महिना हा हिंदू कॅलेंडरचा 11वा महिना आहे. यंदा 18 जानेवारीपासून म्हणजे आजपासून माघ महिना सुरू झाला आहे. हा महिना 16 फेब्रुवारी 2022 रोजी संपेल.

Magh month importance : हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व (Magh month significance) आहे. माघ महिना हा हिंदू कॅलेंडरचा (Hindu calendar) 11वा महिना आहे. यंदा 18 जानेवारीपासून म्हणजे आजपासून माघ महिना सुरू झाला आहे. हा महिना 16 फेब्रुवारी 2022 रोजी (Magh Month Dates) संपेल. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात दान आणि स्नान करण्याला अंत्यंत महत्त्व आहे. माघ हा शब्द माधव या भगवान श्रीकृष्णाच्या (Lord Krishna) रूपाशी संबंधित आहे. चला जाणून घेऊया काय आहे याच्याशी संबंधित श्रद्धा आणि मान्यता…
Also Read:
माघ महिन्याचे विशेष महत्त्व
माघ महिन्यात पवित्र नदीत स्नान आणि दान इत्यादी अतिशय शुभ मानले (Special significance of Magh month) जाते. माघ महिन्यात अनेक धार्मिक सण येतात तसेच निसर्गही अनुकूल होऊ लागतो. या महिन्यात संगमावर कल्पवास देखील केला जातो यामुळे व्यक्ती शरीर आणि आत्म्यापासून पवित्र होते. पौराणिक कथेनुसार (mythology) माघ महिन्यात गौतम ऋषींनी (Gautam Rishi) इंद्रदेवांना शाप दिला (Sage Gautama cursed Indra) होता. इंद्रदेवांना आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी गौतम ऋषींची माफी मागितली. गौतम ऋषींनी इंद्रदेवांना माघ महिन्यात गंगेत स्नान (Bath in Ganga) करून प्रायश्चित्त करण्यास सांगितले. त्यानंतर माघ महिन्यात इंद्रदेवांनी (Indradev) गंगेत स्नान केले. त्यामुळे इंद्रदेवांना शापापासून मुक्ती मिळाली. त्यामुळे या महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व आहे.
अशी करा पूजा
माघ महिन्याच्या सकाळी भगवान श्रीकृष्णाला पिवळी फुले अर्पण करून पंचामृत अर्पण करावे. माघ महिन्यात श्री कृष्णाच्या मंत्रांचा जप करावा आणि पवित्र नदीत स्नान करावे. एखाद्या गरीबाला नियमित अन्नदान करा. शक्य असल्यास एकाच वेळी जेवण करा.
हे बदल नक्की करा
या महिन्यात सात्विक अन्न खावे आणि श्रीकृष्णाची पूजा करावी. गरम पाणी हळूहळू सोडून सामान्य पाण्याने आंघोळ सुरू करावी. सकाळी उशिरापर्यंत झोपणे आणि आंघोळ न करणे आरोग्यासाठी चांगले नसते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या