Top Recommended Stories

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला या 4 राशींच्या लोकांवर राहील शिवशंकराची कृपादृष्टी, होईल भरभराटी...

Mahashivratri 2022: महाशिवरात्री (Mahashivratri) पर्व जवळ आले आहे. देशभरात 1 मार्च 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी देवांचा देव म्हणजेच भगवान शिवाची (Lord Shiva) पूजा केली जाते. शिवभक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो.

Updated: February 25, 2022 12:53 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला या 4 राशींच्या लोकांवर राहील शिवशंकराची कृपादृष्टी, होईल भरभराटी...

Mahashivratri 2022: महाशिवरात्री (Mahashivratri) पर्व जवळ आले आहे. देशभरात 1 मार्च 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी देवांचा देव म्हणजेच भगवान शिवाची (Lord Shiva) पूजा केली जाते. शिवभक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. महाशिवरात्रीला भोळ्या शंकराला (Mahashivratri Puja) प्रसन्न केल्याने आपल्या जीवनातील सर्व कष्टे दूर होतात. इतकेच नाही तर सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्याचे वरदान देखील मिळते.

Also Read:

यंदाची महाशिवरात्र 12 राशीच्या लोकांसाठी उचीत फळ देणारी असणार आहे. मात्र, 4 राशींच्या लोकांना विशेष फळ देऊन जाणार आहे. या राशींच्या लोकांना शिवशंकराची कृपादृष्टी राहाणार आहे. त्यांची आर्थिक भरभराटी होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या आहेत, त्या 4 राशी?

You may like to read

मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना देखील यंदाची महाशिवरात्री शुभ फळ देणारी ठरणार आहे. या कालावधीत तुम्ही केवळ कामापूरता पैसे कमवू शकणार नाही तर मोठी सेव्हिंग देखील करू शकतात.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. या लोकांचे अडकले पैसे परत मिळतील. याशिवाय नोकरीत बढती मिळू शकते. या लोकांना उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत सापडतील.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री अत्यंत शुभ ठरणार आहे. या लोकांवर शिवाची कृपा राहील. प्रगतीचा नवा मार्ग सापडेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळेल. वरिष्ठ कामावर खूश होती. परिश्रमाचे योग्य फळ मिळेल.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी यंदाची महाशिवरात्री विशेष फळ देणारी ठरणार आहे. शिवशंकराची त्यांच्यावर कृपा राहणार आहे. त्यांची रखडलेली कामे मार्गी लागतील. महाशिवरात्रीला तुम्ही नवा व्यवसाय सुरू करू शकतात. नवी नोकरी शोधू शकतात. आर्थिक चणचण दूर होईल.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. india.com याची पुष्टी करत नाही. याबाबत अधिक माहितीसाठी विशेषतज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 25, 2022 12:52 PM IST

Updated Date: February 25, 2022 12:53 PM IST