Top Recommended Stories

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला असा करा 'रुद्राभिषेक', क्षणात नाहिसे होतील सर्व रोग आणि दुःख

Mahashivratri 2022: यजुर्वेदानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाने ग्रह-नक्षत्रांचे वाईट प्रभाव दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते.

Published: February 28, 2022 2:57 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

sawan rudrabhishek shivling
Shiv Rudrabhishek kaise karen

Mahashivratri 2022: यजुर्वेदानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाने ग्रह-नक्षत्रांचे वाईट प्रभाव दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते. महाशिवरात्री हे पवित्र पर्व 1 मार्च, मंगळवारी साजरे करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. रुद्राभिषेकाचा महिमा वेदांमध्येही वर्णिला आहे. रुद्राभिषेक घरी किंवा शिवमंदिरात केल्यास खूप फायदा होतो. रुद्राभिषेक केल्याने ग्रह-नक्षत्रांचे वाईट प्रभाव संपतात. यासोबतच आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात, असे यजुर्वेदात सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊ या रुद्राभिषेकाचा योग्य विधी…

Also Read:

रुद्राभिषेक विधी (Rudrabhishek Vidhi)

रुद्राभिषेक करण्यासाठी शिवलिंग उत्तर दिशेला ठेवावे. अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने आपले मुख पूर्व दिशेला असेल अशा स्थितीत बसावे. सर्वात आधी अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने शिवलिंगपर गंगाजल टाकवे. अभिषेकाला सुरुवात करावी. रुद्राभिषेकादरम्यान, महामृत्युंजय मंत्र, शिव तांडव स्तोत्र, शिव पंचाक्षर मंत्र (नमः शिवाय) किंवा रूद्र मंत्राचा जप करावा. पूजा करताना शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा. बेलपत्र, सुपारी आणि इतर पूजा सामग्री शिवलिंगावर अर्पण करावी. शिवशंकराला नैवेद्र दाखवावा.

You may like to read

शिव मंत्राचा 108 वेळा जप करावा. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन शिवशंकराची आरती म्हणावी. आरती झाल्यानंतर अभिषेकाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. अभिषेकदरम्यान, शिव मंत्रांचा जप करावा.

अभिषेकाच्या आधी देवी-देवतांना आवाहन करावे…

रुद्राभिषेक एक महत्त्वपूर्ण पूजा आहे. त्यामुळे अभिषेक सुरू करण्यापूर्वी देवी-देवतांना आवाहन करावे. सगळ्यात आधी गणपतीला आवाहन करावे. त्यानंतर माता पार्वती, नवग्रह, पृथ्वी माता, ब्रह्मदेव, मां लक्ष्मी, अग्नि देव, सूर्य देव आणि मां गंगाला आवाहन करून पूजा करावी. सर्व देवी-देवतांचे नाव घेऊन त्यांना अक्षता, फूल अर्पण करावे. त्यानंतर रुद्राभिषेक करावा.

रुद्राभिषेक पूजा सामग्री (Rudrabhishek Pujan Samagri)

गायीचे शुद्ध तूप, विड्याचे पाने, फूल, चंदन, धूप, गंध, कपूर, बेलपत्र, मिठाई, फळे, शहद, दही, ताजे दूध, गुलाब जल, मेवा, पंचामृत, नारळ पाणी, ऊसाचा रस, चंदन पाणी, गंगाजल, सुपारी आणि नारळ.

(Disclaimer:या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. india.com याची पुष्टी करत नाही. याबाबत अधिक माहितीसाठी विशेषतज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 2:57 PM IST