Mahashivratri 2022: महाशिवरात्रीच्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने जाणून घ्या कशी झाली रुद्राक्षाची उत्पत्ती
Mahashivratri 2022: मंगळवारी 1 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा अतिशय मोठा उत्सव असतो. या दिवशी शिवभक्त मनोभावे शिव प्रभूंची प्रार्थना करतात आणि भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात.

Mahashivratri 2022: मंगळवारी 1 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. भगवान शंकराच्या (Lord Shankar) भक्तांसाठी हा अतिशय मोठा उत्सव असतो. या दिवशी शिवभक्त मनोभावे शिव प्रभूंची (Lord Shiv) प्रार्थना करतात आणि भोलेनाथाला (Bholenath) प्रसन्न करण्यासाठी उपवास (Mahashivratri Vrat 2022) करतात. जिथे भगवान शंकराचा उल्लेख येतो तेथे त्यांच्या आवडत्या वस्तूंपैकी एक म्हणजे रुद्राक्षाचाही (Rudraksha) उल्लेख होतो. रुद्राक्ष धारण करणे अतिशय लाभदायक मानले जाते. रुद्राक्ष एका मुखीपासून चौदा मुखींपर्यंत असतो. प्रत्येक रुद्राक्षाचे स्वतःचे महत्त्व असते. परंतु ते धारण करण्याचे काही नियम आहेत. शिव मंत्रोच्चारासाठी रुद्राक्षाचा वापर केला जातो. महाशिवारात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली आणि ते धारण करण्याचे काय आहेत नियम…
Also Read:
कशी झाली रुद्राक्षाची उत्पत्ती?
प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी भगवान शिव हजारो वर्षे साधना करत होते. एके दिवशी त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब जमिनीवर पडला. त्या अश्रूतून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. मानव कल्याणासाठी रुद्राक्ष वृक्ष पृथ्वीवर पसरले आहेत. तेव्हापासून भगवान शिवाची पूजा करण्यासाठी किंवा भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाचा वापर केला जातो.
रुद्राक्ष धारण करण्याचे नियम
- दुसर्याने घातलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नका किंवा तुमचा रुद्राक्ष दुसर्याला घालू नका.
- रुद्राक्षाची माळ बनवताना लक्षात ठेवा की त्यात किमान 27 मणी असावेत.
- रुद्राक्षाला घाणेरड्या हातांनी कधीही स्पर्श करू नका. रुद्राक्षाची माळ नेहमी आंघोळीनंतरच घालावी.
- रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा. काळ्या धाग्यात कधीही घालू नये.
- तुम्ही जर रुद्राक्ष धारण करत असाल तर मांसाहार करू नका. असे केल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते.
- रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने दररोज भगवान शंकराची पूजा करावी. यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात.
महाशिवरात्री शुभ मुहूर्त (Maha Shivratri 2022 Shubh Muhurta)
महाशिवरात्री प्रारंभ तिथी – 1 मार्च 2022 रोजी पहाटे 3.16 वाजता
महाशिवरात्री समाप्ती तिथी – 2 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता
महाशिवरात्रीला चारही प्रहरात पूजा करण्याचा शुभ मुहूर्त (Maha Shivratri Pooja Timings)
रात्रीच्या पूजेचा वेळ – 1 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6.22 वाजेपासून ते रात्री 12.33 वाजेपर्यंत
पहिला प्रहर – सायंकाळी 6.21 वाजेपासून ते 9.27 वाजेपर्यंत
दुसरा प्रहर – रात्री 9.27 वाजेपासून ते 12.33 वाजेपर्यंत
तिसरा प्रहर – रात्री 12.33 वाजेपासून ते सकाळी 3.39 वाजेपर्यंत
चौथा प्रहर – 2 मार्च 2022 रोजी सकाळी 3.39 वाजेपासून ते 6:45 वाजेपर्यंत
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. india.com त्याला दुजोरा देत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञाशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या