Top Recommended Stories

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त वाचा महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याशी संबंधित कथा

Mahashivratri 2022: शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. हा दिवस खास बनवण्यासाठी भाविक आधीच तयारी सुरू करतात. धार्मिक मान्यतांनुसार भगवान शिव त्यांचा तिसरा डोळा उघडतात तेव्हा संपूर्ण सृष्टी भस्म होऊ शकते.

Published: February 28, 2022 12:35 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त वाचा महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याशी संबंधित कथा
Lord Shiva third eye

Mahashivratri 2022: शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा (shivratri 2022) दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. हा दिवस खास बनवण्यासाठी भाविक आधीच तयारी सुरू करतात. धार्मिक मान्यतांनुसार भगवान शिव (Lord Shiva) त्यांचा तिसरा डोळा (Third eye) उघडतात तेव्हा संपूर्ण सृष्टी भस्म होऊ शकते. तीन डोळ्यांमुळे महादेवाला त्रिकालदर्शी (Trikaldarshi) असेही म्हणतात. कारण ते भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ पाहू शकतात. महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) निमित्ताने शिवभक्तांसाठी महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यामागील रहस्य काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजचा हा लेख याच विषयावर आहे.

Also Read:

कसा प्राप्त झाला तिसरा डोळा ?

शिव प्रभूंना त्यांच्या तप, ध्यान आणि एकाग्रतेमुळे हा डोळा प्राप्त झाला अशी श्रद्धा आहे. तीन डोळे असलेले शिव शंकर हे एकमेव देव आहेत.

You may like to read

तिन्ही काळांचे प्रतीक

भोलेनाथांना भविष्यातील सर्व गोष्टी ज्ञानाच्या डोळ्यानेच कळतात असे मानले जाते. आता तुम्ही विचार करत असाल की ज्ञानाचा डोळा म्हणजे काय? तर भगवान शंकराच्या कपाळावर असलेल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ज्ञानाचा डोळा आज्ञाचक्रावर स्थित आहे. पुराणानुसार भोलेनाथाचे तीन डोळे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ या 3 काळांचे रुप म्हणून ओळखले जातात. भोलेनाथाचे तीन डोळे हे स्वर्ग, नरक आणि तिन्ही लोकांचे प्रतीक आहेत.

तिसऱ्या डोळ्याशी निगडीत कथा

माता सतीने आत्मदहन केल्यानंतर भगवान शिव अनेक वर्षे तपश्चर्येत लीन होते. दुसरीकडे, माता सतीने माता पार्वती म्हणून जन्म घेतला. माता पार्वती आणि भगवान शिव यांनी एकमेकांना भेटावे अशी देवतांची इच्छा होती. पण शिव प्रभूंचे लक्ष कोणी विचलित केले तर त्यांना राग येईल हे सर्वांना माहीत होते. यामुळे सर्व देव शांत राहिले. तेव्हा कामदेव पुढे आले आणि त्यांनी बाण सोडले आणि भगवान शंकराची पूजा मोडली. कामदेवाच्या पुष्पवणामुळे भगवान शिव अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि तिव्र ज्वाला काढून कामदेवाला भस्म केले.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञाशी संपर्क साधा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 12:35 PM IST