शिवभक्तांना पाठवा महाशिवरात्रीचे मराठी शुभेच्छा संदेश - Mahashivratri Marathi Shubhechha Sandesh

Mahashivratri Marathi Shubhechha Sandesh : यंदा फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीची महाशिवरात्री मंगळवारी 1 मार्च रोजी साजरी होणार आहे. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही.

Updated: February 28, 2022 2:15 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

शिवभक्तांना पाठवा महाशिवरात्रीचे मराठी शुभेच्छा संदेश - Mahashivratri Marathi Shubhechha Sandesh
Mahashivratri Shubhechha Sandesh in marathi

Mahashivratri Marathi Shubhechha Sandesh : यंदा माघ मासातील (Phalgun Maas) कृष्ण पक्षातील चतुर्दशीची महाशिवरात्री मंगळवारी 1 मार्च रोजी साजरी होणार आहे. भगवान शंकराच्या (Lord Shiv) भक्तांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. या दिवशी शिवभक्त भोलेनाथाची पूजा (Mahashivratri Wishes, Quotes & Messages) करून उपवास करतात. याशिवाय चारही वेळा पूजा करून लोक भगवान शिवाला प्रसन्न करतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही शिवभक्तांना काही संदेश (Mahashivratri 2022 Wishes & Quotes) पाठवून त्यांची श्रद्धा वाढवू शकता.

Also Read:

महाशिवरात्रीनिमित्ताने मित्र आणि नातेवाईकांना पाठवा हे शुभेच्छा संदेश (Happy Mahashivaratri, Photos, Status, Messages, Quotes, Shayari Marathi 2022)

शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
ओम नमः शिवाय


शिवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा..!

शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


HAPPY MAHASHIVRATRI WISHES IN MARATHI

भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

न जगण्याचा आनंद
न मरणाचे दुःख
फक्त जोपर्यंत आहे जीव
तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

महादेवामुळे संसार आणि
महादेवामुळेच शक्ती आहे
स्वर्ग सुख आणि आनंद
महादेवाची भक्ती आहे.
हर हर महादेव


Best wishes for Mahashivaratri, Best wishes for Mahashivaratri in Marathi

महादेवच स्वर्ग आहेत
महादेवच मोक्ष आहेत
महादेव प्राप्ती हेच
जीवनाचे लक्ष आहे
हर हर महादेव

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख!

महाशिवरात्रीला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


Mahashivratri 2022 Quotes, Good luck message

जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शिवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


mahashivratri caption in marathi, , Mahashivratri whatsapp status in marathi

शि व सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शि व अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शि व ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शि व भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


Mahakal status in marathi, Mahashivaratri Suvichar Marathi, Bhagwan shankar status in marathi

बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

मृत्यू चे नाव काल आहे,
अमर फक्त महाकाल आहे
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत
चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत.
हर हर महादेव.

तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर महादेवाच्या कृपा होवो.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy Mahashivaratri Banner Marathi 2022,

चिंता नाही काल ची
बस कृपा कायम राहो
महाकाल ची…!
हर हर महादेव

संपूर्ण जग आहे ज्याच्या शरण मध्ये
नमन करतो त्या शंकराच्या चरण मध्ये
चला बनुया शंकराच्या चरणांची धुल
मिळून वाहुया त्यांना श्रध्देचे फुल.
भगवान शंकर आपल्या दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 1:50 PM IST

Updated Date: February 28, 2022 2:15 PM IST