Makar Sankranti 2022 Rashifal: मकर संक्रांतीला राशीनुसार या वस्तू करा दान, आयुष्यात सुख-समृद्धी आणि भरभराटी येईल!

Makar Sankranti 2022 Rashifal: मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या वस्तू दान करणे शुभ राहते हे जाणून घ्या....

Published: January 13, 2022 10:41 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

makar sankranti 2022
Makar Sankranti 2022

Makar Sankranti 2022 Rashifal : 14 जानेवारी 2022 म्हणजे उद्या मकर संक्रांत सण (Makar Sankrant) आहे. हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण असतो. यावर्षी मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2022 ) सण पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत सणाच्या दिवशी तीळगूळ वाटले जाले. ‘तीळ गूळ घ्या, गोड बोला’ असं म्हणत सर्वांना तिळ आणि गूळ वाटत शुभेच्छा दिल्या जातात. मकर संक्रांत सणांच्या दिवशी तीळ आणि खिचडी दान (Donate) करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की मकर संक्रांतीला गुळाचे दान केल्यान आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते. त्याचसोबत पैशांची कमतरा कधीही भासत नाही. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या वस्तू दान करणे शुभ राहते (Makar Sankranti 2022 Rashifal) ते पाहणार आहोत. या राशिच्या लोकांनी खाली सांगितल्याप्रमाणे वस्तू दान केल्या तर त्यांच्या जीवनामध्ये आनंदी वातावरण आणि सुख-समृद्धी येईल.

Also Read:

या राशीच्या लोकांनी या वस्तू करा दान –

मेष –
मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ, शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ दान करणे शुभ राहिल. त्याचसोबत या राशीची लोकं कपडे देखील दान करू शकता.

वृषभ –
वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे कपडे, दही आणि तीळ दान करणे शुभ राहिल. त्यांनी या गोष्टी दान केल्यास त्यांच्या घरात सुख-समृद्धी येईल.

मिथुन –
मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मूग डाळ, तांदूळ आणि घोंगडी दान करणे शुभ राहिल. या राशीतील ज्या लोकांना शारीरिक वेदना आहेत या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ते चादर आणि छत्र्याही दान करू शकतात.

कर्क –
कर्क राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ, चांदी आणि पांढरे तीळ दान करणे शुभ राहिल. कर्क राशीची लोकं दूध किंवा तूप देखील दान करू शकतात.

सिंह –
सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू लोकांला ब्लँकेट दान करणे खूप फायदेशीर राहिल. या राशीची लोकं तांबे आणि गहू देखील दान करू शकता.

कन्या –
कन्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी, ब्लँकेट आणि हिरवे कपडे दान करणे शुभ राहिल. असे केल्याने या राशीच्या लोकांच्या घरात सुख-समृद्धी येईल.

तूळ –
तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे कपडे, साखर आणि ब्लँकेट दान करणे शुभ राहिल.

वृश्चिक –
वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ, लाल कपडे आणि तीळ दान करणे शुभ राहिल. याचा फायदा या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात नक्कीच होईल.

धनु –
धनु राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या गोष्टी दान कराव्यात. पिवळे कपडे, पिवळी मसूर, हळद यांचे दान करणे शुभ राहिल.

मकर –
मकर राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी ब्लँकेट, काळे तीळ आणि तेल दान करणे शुभ राहिल.

कुंभ –
कुंभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या गोष्टी दान कराव्यात. काळे उडीद, काळे कपडे आणि काळे तीळ दान करणे शुभ राहिल.

मीन –
मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी रेशमी कपडे, हरभरा डाळ, तीळ आणि तांदूळ दान करणे फायदेशीर राहिल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 13, 2022 10:41 AM IST