मुंबई : सिल्की, जाड, लांबसडक आणि स्मूद केस (Long, Silky Hair)असावेत असं प्रत्येक महिलेला वाटत असते. पण धूळ-माती आणि वाढत्या प्रदूषणामुळे (increasing pollution) केस गळतीच्या (Hair Fall) समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसंच उन्हाळा (Summer), पावासाळा (rainy season) आणि हिवाळ्यामध्ये (Winter) देखील केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केस गळणे, कुमकुवत होणे, कोंडा होणे, केसाची वाढ खुंटणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना आपण करत असतो.Also Read - Green Tea For Health : तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी सेवन करता का? वेळीच व्हा सावध नाहीतर होईल नुकसान  

केसाच्या या समस्यांपासून (Hair Problem) सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा, शॅम्प्यू आणि कन्डिशनरचा (oils, shampoos and conditioners ) वापर केला जातो. पण बऱ्याचदा त्याचा काहीच फायदा होत नाही. अशामध्ये काही घरगुती उपाय (Home remedies) फायदेशीर ठरतात. चांगले, दाट आणि सिल्की केसांसाठी तुम्ही मलईचा वापर करु शकता. आज आम्ही तुम्हाला मलईचा (Malai) वापर करुन केसासाठी हेअर मास्क कसा तयार करायचा हे सांगणार आहोत… Also Read - Healthy Diet: वाढत्या वयानुसार कसा असावा तुमचा आहार? वयोमानानुसार ठरवा खाण्याच्या सवयी

मलई आणि केळीचा हेअर मास्क (Cream and Banana Hair Mask) –

मलई आणि केळीचा हेअर मास्क तयार करण्यासाठी एक पिकलेली केळी, दोन चमचे मलई आणि एक चमचा दूध घ्या. एका वाटीमध्ये हे सर्व पदार्थ घेऊन त्याची चांगली पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट केसाला व्यवस्थित लावा. काही तास केस असेच ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. यामध्ये असलेले प्रोटिन्स तुमच्या केसाची मुळं मजबूत करतात. यासोबतच तुमचे केस सिल्की देखील होतील. Also Read - Apple Benefits : रोज सकाळी सफरचंद खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, हे आजार राहतील दूर!

मध आणि मलईचे हेअर मास्क (Honey and cream hair mask) –

हे हेअर मास्क तयार करण्यासाठी तीन चमचे मलई आणि एक चमचा मध घ्या. एका वाटीमध्ये दोन्ही पदार्थ एकत्र मिक्स करुन त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसाच्या मुळांवर लावा. तीस मिनिटं केस असेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवा. मधामुळे केस सिल्की होतात आणि केसाची मुळं मजबूत होतात.

मलई आणि ऑलिव ऑइलचा हेअर मास्क ( cream and olive oil Hair mask) –

हे हेअर मास्क तयार करण्यासाठी दोन चमचे मलाई, दोन चमचे नारळाचे दूध आणि दोन चमचे ऑलिव ऑइल घ्या. हे सर्व पदार्थ एका वाटीमध्ये मिक्स करुन घ्या आणि ते व्यवस्थित आपल्या केसाला लावा. 30 मिनिटं केस असेच सोडा. त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.