Top Recommended Stories

Mangal gochar 2022: मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाने उजळेल 'या' राशींचे भाग्य ! जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होईल परिणाम!

Mangal gochar 2022: मंगळ ग्रहाचे 26 फेब्रुवारी 2022 रोजी राशी परिवर्तन होत आहे. मंगळ ग्रह धनु राशीतून शनीची राशी मकरमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर याचा परिणाम दिसून येईल.

Published: February 25, 2022 6:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

सिंह राशि
सिंह राशि

Mangal Gochar 2022 : ज्योतिष शास्त्रात (Astrology) ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. यात काहींना शुभ परिणाम मिळतात तर काहींसाठी ग्रहांचे राशी परिवर्तन त्रासदायक ठरते. अशातच भूमी, धैर्य आणि पराक्रमाचे कारक असलेल्या मंगळ ग्रहाचे (mangal grah) 26 फेब्रुवारी 2022 रोजी राशी परिवर्तन होत आहे. मंगळ ग्रह धनु राशीतून शनीची राशी मकरमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर याचा परिणाम दिसून येईल. त्यानुसार जाणून घेऊया मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन (mangal grah rashi parivartan) तुमच्यासाठी कसे असणार आहे.

Also Read:

मेष (Aries) –

मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी धन लाभ देणारे ठरणार आहे. यासह करिअरमध्ये प्रगती होईल. या कालावधीत गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी व्यवहारात सतर्क राहण्याची गरज आहे.

You may like to read

वृषभ (Taurus) –

मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन वृषभ राशींच्या व्यापाऱ्यांना मोठा धनलाभ करून देणारे ठरेल. तर नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सामान्य असणार आहे. नातेसंबंधात धैर्याने काम करा.

मिथुन (Gemini) –

मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यापाऱ्यांनी देखील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रामाणिक आणि धैर्याने प्रयत्न करत राहिल्यास यश मिळेल.

कर्क (Cancer) –

कर्क राशीच्या लोकांना या कालावधीत जास्त मेहनत करून देखील अपेक्षित फळ मिळणार नाही. 7 एप्रिल 2022 पर्यंत नवीन कामाची सुरुवात करू नका. यासह कोणाशी वाद देखील घालू नका.

सिंह (Leo) –

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन लाभकारक ठरणार आहे. करिअरमध्ये यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. शत्रू पराभूत होत तुमचा दबदबा वाढेल.

कन्या (Virgo) –

कन्या राशीच्या जातकांना या राशी परिवर्तन दरम्यान धैर्य राखण्याची गरज आहे. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळ लागू शकतो. इतर बाबतीत स्थिती सामान्य राहील.

तुळ (Libra) –

तुळ राशीच्या लोकांवर मंगळाची कृपा होत नवीन संपत्ती मिळू शकते. मात्र करिअरच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

वृश्चिक (Scorpio) –

या राशी परिवर्तनादरम्यान वृश्चिक राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल. मंगळ ग्रहाच्या कृपेने मेहनतीला फळ देखील लाभेल. ही वेळ वृश्चिक राशीसाठी चांगली ठरणार आहे.

धनु (Sagittarius) –

धून राशीच्या लोकांनी 7 एप्रिल 2022 पर्यंत गुंतवणूक आणि व्यवहाराबाबत सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा समस्येला सामोरे जावे लागेल.

मकर (Capricorn) –

मकर राशीच्या लोकांनी या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवत संयम राखावा. नवीन मालमत्ता खरेदीसाठी ही वेळा चांगली आहे.

कुंभ (Aquarius) –

या कालावधीत कुंभ राशीच्या लोकांना कामात अडथळे येतील. यामुळे जास्त मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळणार नाही. तसेच या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवावा.

मीन (Pisces) –

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन करिअरमध्ये सफलता आणि पदोन्नतीचे कारक ठरेल. उत्पन्न देखील वाढेल आणि वेळा देखील चांगली राहिल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या