Mangalvar Che Upay: वैवाहिक जीवनातील समस्या, कर्जमुक्तीसाठी मंगळवारी करा 'हे' अचूक उपाय
Mangalvar Che Upay : पुराणामध्ये (Puran) व्यक्तीच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक अध्यात्मिक उपाय (Adhyatmik Upay ) सांगण्यात आले आहे. त्यानुसार जी व्यक्ती वैवाहिक समस्या किंवा कर्जाच्या तणावाखाली आहे, अशा व्यक्तींसाठी मंगळवारी हनुमानजींचे (Bhgavan Hnuman) उपाय (Mangalvar Upay) सांगण्यात आले आहे. मंगळवारी हे उपाय केल्याने सुख-शांति लाभते तसेच कुंडलीतील मंगळदोष (Mangal Dosh) दूर होत शुभ फळ प्राप्त होते.

Mangalvar Che Upay : सनातन धर्मानुसार, ( Sanatan Dharma ) मंगळवारचा दिवस खूप शुभ मानण्यात आला आला आहे. मंगळवार हा दिवस भगवान हनुमानजी (bhgavan hanuman) यांना समर्पित आहे. हनुमानजी हे चिरंजीवी असून मंगळवारी त्यांची उपासना केल्याने प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते. हिंदू शास्त्रामध्ये हनुमानजींना ( Lord hanuman) ‘संकट मोचन’ (Sankat Mochan ) म्हटले आहे. ते आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. तुम्हाला वैवाहिक किंवा कर्जाची समस्या असल्यास ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
या लेखात भगवान हनुमानजींच्या काही उपायांबद्दल सांगणार आहोत. मंगळवारी हे उपाय केल्यास व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील समस्या तसेच कर्जापासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया हनुमानजींच्या उपायांविषयी सविस्तर..
वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी मसूरची डाळ दान करा
ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ नीच स्थितीत असेल, अशा लोकांना वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यां दूर करण्यासाठी मंगळवारी मसूरच्या डाळीचे दान करावे असे केल्याने लाभ मिळतो.
व्रत ठेवत करा मंत्र जप
भगवान हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मंगळवारी व्रत केले पाहिजे. व्रत केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात. या दिवाशी पूजा पाठ करत 108 वेळा ‘ॐ हनुमते नमः’ मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने भगवान हनुमान स्वतः आपल्या भक्तांची रक्षा करतात. जर तुम्ही कर्जामुळे परेशान असाल तर मंगळवारी ऋण मोचन अंगारकी स्रोतचा पाठ करावा. तुमच्या जीवनात कायम समस्या येत असेल तर मंगळवारी सुंदरकांड पाठ करावा.
मंगळग्रह मजबूत करण्यासाठी हे करा उपाय
तुमच्या कुंडलीतील मंगळग्रह मजबूत करण्यासाठी मंगळवारी लाल चंदन, तांबे, गहूचे दान करावे. जर तुम्ही तुमच्या कुंडली मंगळ ग्रह उच्चं स्थानावर आणायचा असल्यास मंगळावारी लाल कपड्यांचे दान द्यावे.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या