Top Recommended Stories

Mangalwar Che Upay : मंगळवारी करा 'हे' सोपे उपाय... कुंडलीतील मंगळदोष एका क्षणात होतील दूर!

Mangalwar Che Upay : आपल्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी ज्योतिषशास्त्रात (Astrology) अनेक उपाय (Astrology Remedy) सांगितले आहेत. प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे उपाय सुचवण्यात आले आहेत. त्यानुसार मंगळवारी देखील काही उपाय (Mangalwar Upay) केल्यास आपल्या प्रगतीतील अडथळे दूर होतात.

Published: July 26, 2022 7:33 AM IST

By पी.संदीप | Edited by पी.संदीप

मंगळवारी करा 'हे' सोपे उपाय... कुंडलीतील मंगळदोष होतील दूर!
मंगळवारी करा 'हे' सोपे उपाय... कुंडलीतील मंगळदोष होतील दूर!

Mangalwar Che Upay : मंगळवारी व्रत (Mangalwar Vrat) तसेच काही वस्तूंचे दान करणे शुभ मानले गेले आहे. व्यक्तीच्या कुंडलीतील मंगळदोष (Mangaldhosh) दूर होत मंगळ ग्रह शुभ फळ देतो. यासह या व्रतामुळे संतान संबंधीची समस्या देखील दूर होते. हनुमान भक्तांसाठी देखील हे व्रत लाभकारी असून भगवान हनुमानाच्या कृपेने (Hanuman) हे व्रत करणारे व्यक्ती भयमुक्त होतात. त्यानुसार या लेखात जाणून घेऊया मंगळवारच्या उपाय विषयी माहिती.

मंगळवारी व्रत केल्याने शत्रूंचा नाश होत शनिदोषापासून देखील मुक्ती मिळते. मंगळवारी व्रत केल्याने घर, वाहन आदी सुख प्राप्त होते. ज्यांना हे व्रत सुरु करायचे आहे, ते कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या मंगळवारपासून हे व्रत सुरू करू शकता. 21 किंवा 45 मंगळवार हे व्रत केले जातात.

You may like to read

मंगळवारी करा ‘या’ वस्तूंचे दान

मंगळदोष दूर करण्यासाठी मंगळवारच्या व्रताचे महत्त्व आहे. हे व्रत करण्यासाठी सकाळी लवकर उठून अंघोळ करून लाल वस्त्र परिधान करावे. पुरुष हे व्रत करत असेल तर पूजा करताना शिवलेले वस्त्र परिधान करू नये. पूजा घरातील ईशान्य बाजूस मांडावी. पाटावर भगवान हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. सोबत प्रभू श्रीराम, माता सीता यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावा. हातात पाणी घेत भगवान हनुमान समोर व्रत संकल्प घेत प्रार्थना करावी. त्यानंतर धूप दीप लावून प्रभू श्रीराम, माता सीता यांची पूजा करावी. त्यानंतर भगवान हनुमानाची पूजा करावी. पूजेदरम्यान भगवान हनुमान यांना लाल वस्त्र, शेंदूर आणि लाल फूल अर्पण करावे. त्यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा.

दरम्यान, व्रत कथा, सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचा पाठ करून शेवटी आरती करावी. त्यानंतर भगवान हनुमान यांना गूळ आणि हरभऱ्याचे नैवद्य द्यावे. या दिवशी गूळ आणि गव्हाचे जेवण करावे. दिवसभर मीठ सेवन करू नये. तुम्ही गोड जेवणासह फळ आणि दूध घेऊ शकतात.

लाल चंदनाची माळा घेत 108 वेळा ” ऊं क्रां क्रीं क्रौं स: भौमाय नम: ” ह्या मंत्राचा जाप करावा. यासह व्रताच्या दिवशी मसूरची डाळ, सोने, तांब्याची भांडी, गूळ तीळ, लाल कपडे दान करावे. हिंदू धर्मात दानधर्माला विशेष महत्त्व आहे. मंगळवारच्या दिवशी दान केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते. यासह कुंडलीतील मंगळ दोष दूर होण्यास मदत होते.


असे करा उद्यापन

तुम्ही जितक्या व्रतांचा संकल्प केला आहे, त्याच्या पुढच्या मंगळवारी उद्यापन करू शकतात. तुम्ही 21 व्रतांचा संकल्प केला असेल तर 21 मंगळवार व्रत केल्यानंतर 22 व्या मंगळवारी उद्यापन करावे. भगवान हनुमानाची विधिवत पूजा केल्यानंतर भगवान हनुमानासाठी हवन करत वस्त्र अर्पण करावे. या दिवशी ब्राह्मणाला जेवण देत दान द्यावे.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>