By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mangalwar Che Upay : मंगळवारी सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळेस करा हनुमानजींची पूजा, तुमच्या मनोकामना होतील पूर्ण
Mangalwar Che Upay : ज्योतिष शास्त्रात ( Jyotish Shashtra ) व्यक्तीच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक अध्यात्मिक उपाय ( Adhyatmik Upay ) सांगण्यात आले आहे. हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होते. मंगळवारच्या दिवशी करायचे काही उपाय ( Mangalwar Upay ) देखील ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे.

Mangalwar Che Upay : ज्योतिष शास्त्रात ( Jyotish Shashtra ) व्यक्तीच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक अध्यात्मिक उपाय ( Adhyatmik Upay ) सांगण्यात आले आहे. हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होते. मंगळवारच्या दिवशी करायचे काही उपाय ( Mangalwar Upay ) देखील ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. मंगळवारचा दिवस हा भगवान हनुमानजी ( Lord Hanuman ) यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत केल्याने कुंडलीतील मंगळ दोष ( Mangal Dosh ) कमी होत व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात.
Also Read:
कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच मंगळवारी व्रत केल्याने व्यक्तीच्या मन-सन्मान, बल, साहस आणि पुरुषार्थमध्ये वृद्धी होते. सुयोग्य सनातन प्राप्तीसाठी देखील हे व्रत लाभदायक मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया मंगळवारच्या व्रताविषयी माहिती.
असे करा व्रत
भगवान हनुमानजी यांना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ब्रह्म मुहूर्तला उठून स्नान आदींपासून निवृत्त व्हावे. त्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. लाला कपडे परिधान करून हातात जल घेत व्रताचा संकल्प करा. यानंतर हनुमानजींच्या समोर साजूक तुपाचा दिवा लावत फुलाहार किंवा फुलं अर्पण करावे. समोर चमेलीच्या तेलात भिजलेला कापूस ठेवावा. आता मंगळवार व्रताची कथा वाचावी. त्यानंतर हनुमान चालीसा आणि सुंदर कांड पाठ करावा. शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा. सर्वांना प्रसाद वाटून स्वतः देखील प्रसाद घ्यावा. तसेच दिवसभरात फक्त एकच वेळा भोजन करावे. 21 मंगळवारपर्यंत हे व्रत केल्याने विशेष लाभ होतो. या दिवशी सायंकाळी देखील हनुमानजींचे विधिवत पूजन करत आरती करावी. जर 21 व्रताचा संकल्प केला असेल तर 22 व्या मंगळवारी विधिवत पूजन करत उद्यापन करावे.
सायंकाळची पूजा आहे विशेष
मंगळवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर पूजा केल्याने भगवान हनुमान लवकर प्रसन्न होतात. मंगळावर मंगळ ग्रहाचा वार देखील मानला जातो. या दिवशी हनुमानजीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे मंगळवारी मंदिरात किंवा घरी हनुमानजींच्या मूर्ती समोर आसनावर बसून मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा. यासोबत अगरबत्ती लावून पुष्प अर्पण करावे. शेंदूर, चमेलीचे तेल अर्पण करावे.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)