Top Recommended Stories

Mango For Weight Loss: जेवल्यानंतर लगेच आंबा खाल्ल्याने वाढते वजन, जाणून घ्या आंबा खाण्याची योग्य वेळ!

Mango For Weight Loss: सध्या मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात आंबे विकायला आले आहेत. काही जण फक्त आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहत असतात. पण ज्यांचे वजन कमी होत आहे ते या काळात आंबा खाऊ शकतात. पण ज्यांचे वजन जास्त आहे आणि ते कमी करण्यासाठी प्रयत्न (Weight Loss) करत आहेत त्यांनी आंबा खाणे टाळावे.

Published: April 29, 2022 2:06 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

mango
mango

Mango For Weight Loss: आंबा (Mango) खायला प्रत्येकाला आवडतो. आंबा हे असे फळ आहे जे फक्त उन्हाळ्यामध्ये (Summer) मिळते. आंबा हे उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. या हंगामात आंब्याचे उत्पादन जास्त होते. मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात आंबे विकायला आले आहेत. काही जण फक्त आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहत असतात. पण ज्यांचे वजन कमी होत आहे ते या काळात आंबा खाऊ शकतात. पण ज्यांचे वजन जास्त आहे आणि ते कमी करण्यासाठी प्रयत्न (Weight Loss) करत आहेत त्यांनी आंबा खाणे टाळावे. आंब्याच्या सेवनाने (Mango For Health) तुमचे वजन तर वाढत नाही ना, याचीही माहिती घेणे गरजेचे आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की, आंब्याचा वजनावर कसा परिणाम होतो.

Also Read:

वजनावर आंब्याचा परिणाम –

काही लोकांना असे वाटते की, आंब्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पण तसे काही नाही. आंबा खाल्ल्याने वजन कमी होत नाही. मात्र, जर तुमचे वजन कमी होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आंब्याचा सहज समावेश करू शकता.

You may like to read

वजन कमी करण्यासाठी आंबा कसा खावा –

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सर्वात आधी तुम्ही आंबा खाणं टाळा. आंबा खाण्याचे जास्त प्रमाण शरीराचे वजन वाढवू शकते.

– आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही जास्त कॅलरी इनटेक करता तेव्हा तुमचे वजन कमी करण्याचा प्रवास फायदेशीर नसला तरी नुकसान होऊ शकतो आणि तुमचे वजन वाढू शकते.

– आंबा जेवन केल्यानंतर कधीही खाऊ नका. कारण ते तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज टाकू शकते. आंब्याचे सेवन नेहमी दुपारी करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आंब्याचे सेवन स्नॅक्स म्हणूनही करू शकता.

– व्यायामानंतरही आंबा खाऊ शकतो. हे एनर्जी बूस्टर म्हणून काम करू शकते. त्याचबरोबर याच्या सेवनामुळे व्यक्तीला बराच काळ थकवा जाणवत नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 29, 2022 2:06 PM IST