Masala Chaha Recipe : या 4 मसाल्यांच्या मदतीने बनवा मसाला चहा, वाढेल प्रतिकारशक्ती
Masala Tea Recipe in marathi : सकाळची सुरुवात असो, पाहुण्यांची रेलचेल असो किंवा मित्रांसोबत गप्पा, चहाशिवाय सर्व काही अपूर्ण असतं. त्यामुळे चहा कडक आणि चवदार असणे खूप महत्वाचे असते.

Masala Tea Recipe in marathi : सकाळची सुरुवात असो, पाहुण्यांची रेलचेल असो किंवा मित्रांसोबत गप्पा, चहाशिवाय (Tea Uses) सर्व काही अपूर्ण असतं. त्यामुळे चहा कडक आणि चवदार असणे खूप महत्वाचे असते. आज आम्ही मसाला (Masala Chaha) चाहाविषयी बोलत आहोत. मसाला चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी (How to Boost Immunity) देखील चांगला असतो. या महामारीच्या काळात मजबूत प्रतिकारशक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मसाला चहाचे सेवन केल्याने तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवू (Boost Immunity) शकता. जाणून घ्या तुम्ही घरी राहून मसाला चाहा कला बनवू शकता.
Also Read:
साहित्य
1 – पाणी – दोन कप
2 – दूध – 30 मिली
3 – चहापत्ती
4- साखर – चवीनुसार
5 – सुंठ पावडर – 1/4 टीस्पून
6 – काळी मिरी – तीन किंवा चार संपूर्ण
7– दालचिनीची स्टिक – एक
8 – हिरवी वेलची – 3 किंवा 4
9 – आलं किसलेले किंवा कुटलेले
10 – लवंगा 2 किंवा 3 संपूर्ण
कृती
1 – सर्वप्रथम तुम्ही गॅसवर पाणी उकळून त्यात चहाची पाने टाका आणि थोडा वेळ उकळू द्या.
2 – चहापत्तीसोबत हिरवी वेलची, दालचिनी, आले, लवंग, सुंठ, काळी मिरी इत्यादी आवश्यक मसाले मिसळा.
3 – चहापत्ती चांगली उकळल्यावर त्यात दूध आणि साखर घालून थोडा वेळ उकळू द्या.
4 – आता चहा गाळून गरम पराठ्यासोबत फ्या.
5 – तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मसाला चहावर गरम मसाला देखील टाकू शकता. असे केल्याने चव वाढू शकते.