Masik shivratri 2022: अविवाहित मुली करू शकतात हे व्रत, मनासारखा जोडीदार
Masik shivratri 2022: प्रत्येक महिन्यात चतुर्दशीला मासिक शिवरात्री ( Masik Shivratri) साजरी केली जाते. त्यानुसार माग महिण्याची (magh maha) कृष्ण पक्ष चतुर्दशी येत्या 30 जानेवारीला आहे.

Masik shivratri 2022: प्रत्येक महिन्यात चतुर्दशीला मासिक शिवरात्री ( Masik Shivratri) साजरी केली जाते. त्यानुसार माग महिण्याची (Magh M0nth Krishna Paksh) कृष्ण पक्ष चतुर्दशी येत्या 30 जानेवारीला आहे. याच दिवशी भगवान शंकर व माता पार्वतीची उपासना केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी व्रत केल्याने अविवाहित मुलींचे लवकर लग्न (Marriage) जुळते. सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. भगवान शंकराची (Bhagvan shankar) पूजा केल्याने कुंडलीतील चंद्राचे स्थान आणखी मजबूत होते. याचा जातकांना लाभ होत मनासारखा जोडीदार मिळतो. त्यामुळे जाणून घ्या, मासिक शिवरात्रीचे व्रत (Masik shivratri Vrat) आणि पूजा (Masik shivratri Pooja).
Also Read:
अशी करा पूजा विधी
मासिक शिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्वप्रथम भगवान शंकर व माता पार्वती याचे नामस्मरण करावे. त्यानंतर नित्य कर्मापासून निवृत्त होत गंगाजल युक्त पाण्याने आंघोळ करावी. भगवान शिव व माता पार्वतीची पूजा दूध, दही, पंचामृत, फळ-फुल, धूप, दीप, भंग, धोतराचे फळ व फूल, बेलपत्र अर्पण करून पूजन कारावे. दरम्यान महामृत्युंजय मंत्र व ओम नमः शिवाय मंत्राचा किमान एक माळ जाप करावा. पूजा आरती झाल्यानंतर भगवान शंकराकडे आपली मनोकामना व्यक्त करावी. शक्य असल्यास दिवसभर उपवास करावा. दुसऱ्या दिवशी पूजा-पाठ संपन्न झाल्यावर व्रत सोडावे. त्यानंतर गरजू तसेच ब्राह्मणांना दान द्यावे. दानधर्म केल्यास व्रताच्या पुण्यप्राप्तीने साधकांची मनोकामना पूर्ण होते.
ही आहे तिथी आणि मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी 30 जानेवारी रोजी आहे. चतुर्दशीला सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी आरंभ होत आहे. सोमवारी म्हणजेच 31 जानेवारी दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी चतुर्दशी समाप्त होत आहे. या दिवशी रात्रीच्या वेळी मासिक शिवरात्री साजरी करत 30 जानेवारी रोजी भाविक उपवास करू शकतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या