Top Recommended Stories

घरीच बनवा मटका कुल्फी, जाणून घ्या ही सोपी रेसिपी - Matka Kulfi Recipe In Marathi

Matka Kulfi Recipe In Marathi : उन्हाळ्यात गर्मी आणि उष्णतेने हैराण झालेले असताना आईस्क्रीम, कुल्फी (Kulfi), ज्यूस, शेक इत्यादी थंड पदार्थांची माजाच वेगळी असते. तुमची ही इछा पूर्ण करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मटका कुल्फीची रेसिपी सांगत आहोत.

Published: April 26, 2022 10:02 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

घरीच बनवा मटका कुल्फी, जाणून घ्या ही सोपी रेसिपी - Matka Kulfi Recipe In Marathi
Matka Kulfi Recipe In Marathi

Matka Kulfi Recipe In Marathi : सध्या उन्हाळा जोरात सुरू आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात एवढे तापमाण नसते जेवढे यावर्षी आहे. त्यामुळे गर्मी आणि उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. या अशा वातावरणात लोकांचा कल थंड पेय आणि खाद्यपदार्थांकडे वाढला आहे. या वातावरणात अनेक जण आईस्क्रीम, कुल्फी (Kulfi), ज्यूस, शेक इत्यादी थंड पदार्थांचे सेवन करत आहेत. तुमची ही इछा दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मटका कुल्फीची रेसिपी (Matka Kulfi Recipe) सांगणार आहोत. मटका कुल्फी शरीराला थंडावा तर देतेच शिवाय चविष्ट देखील असते. तुम्ही घरी देखील उत्तम मटका कुल्फी तयार (Recipe of Matka Kulfi) करू शकता. जाणून घेऊया मटका कुल्फी बनवण्याची रेसिपी आणि ती घरी (Matka Kulfi at Home) कशी बनवता येईल याविषयी…

Also Read:

मटका कुल्फी बनवण्याचे साहित्य

बदाम – 3 ते 4
वेलची पावडर – एक चमचा
ताजी मलई – दोन मोठे कप
केशर – 3 ते 4
दूध पावडर – एक चमचा
काजू – 2 ते 3
पिस्ता – 2 ते 3
साखर – चवीनुसार

You may like to read

मटका कुल्फी बनवण्याची पद्धत

  • सर्वात आधी बदाम, काजू, पिस्ता, वेलची आणि साखर बारीक वाटून घ्या.
  • आता एका भांड्यात फ्रेश क्रीम काढा आणि फेस येईपर्यंत ढवळत राहा.
  • तयार मिश्रणात दूध पावडर आणि केशर घाला आणि ते चांगले फेटून घ्या.
  • आता या मिश्रणात शेंगदाणे टाका आणि नंतर मिश्रण कुल्फीच्या आकाराच्या भांड्यात भरा.
  • आता सजावटीसाठी फॉइल पेपर झाकून ठेवा आणि त्यानंतर मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा.
  • किमान 5 ते 6 तास फ्रीझरमध्ये असेच ठेवा आणि त्यानंतर मुलांना थंड मटका कुल्फी खायला द्या.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या