By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mauni Amavasya 2022: आज आहे मौनी अमावस्या? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व
Mauni Amavasya 2022: हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला मौनी अमावस्या असते. मौनी अमावस्येला माघी अमावस्या असेही म्हणतात.

Mauni Amavasya 2022: हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या (Magh Month) कृष्ण पक्षातील अमावस्येला मौनी (Maghi Amavasya 2022 Date) अमावस्या असते. मौनी अमावस्येला माघी अमावस्या (Maghi Amavasya 2022) असेही म्हणतात. सर्व अमावस्यांमध्ये मौनी अमावस्येला विशेष स्थान आहे. या दिवशी गंगास्नानाचेही (Ganga Snan) महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृतसारखे असते. त्यात स्नान केल्याने सर्व पापे दूर होतात, निरोगी शरीर प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त (Mauni Amavasya 2022 importance) होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज, हरिद्वारसह देशातील प्रमुख तीर्थस्थळांवर स्नान केले जाते आणि लोक स्नान करून पुण्य प्राप्त करतात. मात्र यावेळी कोरोनामुळे मौनी अमावस्येचे स्नान मर्यादित स्वरुपात आणि कोरोना नियमांचे पालन करून करता येईल. चला जाणून घेऊया कधी आहे मौनी अमावस्या आणि तिचे महत्त्व काय याविषयी… (When is Mauni Amavasya? Know the date, moment and importance)
Also Read:
काय आहे मौनी अमावस्येचे महत्त्व? (Mauni Amavasya 2022 importance)
धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येला स्नान केल्यानंतर व्रत केले जाते. या दिवशी लोक मौन धारण करतात. मौन व्रताचा अर्थ म्हणजे स्वतःच्या अंतरंगात डोकावणे, ध्यान करणे आणि भगवंताच्या भक्तीत लीन होणे असा असतो. तसेच स्वतःमध्ये अध्यात्मिक भावना विकसित करणे हे देखील त्याचे एक उद्दिष्ट असते.
मौनी अमावस्या 2022 तिथी आणि मुहूर्त (Mauni Amavasya 2022 shubh muhurta)
पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या सोमवार 31 जानेवारी रोजी दुपारी 02:18 वाजता सुरू होत आहे. ती दुसऱ्या दिवशी 01 फेब्रुवारी मंगळवारी रात्री 11.15 पर्यंत आहे. स्नान वगैरे कार्यक्रम सूर्योदयापासून होत असल्याने मौनी अमावस्या 1 फेब्रुवारीला आहे. या दिवशी नद्यांमध्ये स्नान केले जाईल.
पूर्वजांसाठी केले जातात विधी (Rituals for ancestors)
मौनी अमावस्येच्या दिवशीही इतर अमावस्येप्रमाणे लोक स्नानानंतर पितरांना तर्पण, श्राद्ध, पिंडदान इत्यादी करतात. पितरांच्या आत्मसमाधानासाठी हे विधी केले जातात. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो ते हे सर्व उपाय अमावास्येच्या दिवशी करतात. यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना प्रगती आणि सुखी जीवनाचा आशीर्वाद देतात.
(डिस्क्लेमर: लेखात दिलेला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे या विषयातील तज्ञांचे मत नाही)