Wedding Muhurat In May 2022: विवाहासाठी मे महिन्यात शुभ आहेत हे 15 दिवस, जाणून घ्या मौज, गृहप्रवेशाचे मुहूर्त एका क्लिकवर...
Shubh Muhurat 2022: नव्या महिन्याची सुरूवात होण्याआधीच बहुतांश लोक शुभ मुहूर्त पाहाण्यासाठी दिनदर्शिका अर्थात कॅलेंडर उघडून (Wedding Muhurat In May 2022) बसतात. किंवा पुरोहितांकडून शुभ मुहूर्तांची यादी मागवून घेत असतात. चला तर मग जाणून घेऊ या एका क्लिकवर विवाह, मौज (Maunj) आणि गृहप्रवेशाचे (Vastu Pooja) शुभ मुहूर्त...

Griha Pravesh Muhurat In May 2022: हिंदू दिनदर्शिकेनुसार, वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच वैशाख आणि इंग्रदी कॅलेंडरनुसार पाचवा महिना म्हणजे मे महिना लवकरच सुरू होणार आहे. 1 मे, रविवारपासून सुरू होणार आहे. नव्या महिन्याला सुरूवात होण्याआधी प्रत्येक जण शुभ मुहूर्त जाणून घेण्यास उत्सूक असतो. मे 2022 मध्ये विवाहाचे एकूण 15 शुभ मुहूर्त आहे.
Also Read:
विवाहासाठी 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त सगळ्यात उत्तम आहे. मे महिन्यात तुम्ही मौज, नामकरण, गृह प्रवेश, प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. गृह प्रवेशासाठी एप्रिल महिन्यात एकही शुभ मुहूर्त नव्हता. परंतु, मे महिन्यात गृहप्रवेशासाठी एकूण 10 शुभ मुहूर्त सांगण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊ मे महिन्यातील विवाह, मौज (Maunj) आणि गृहप्रवेशाचे (Vastu Pooja) शुभ मुहूर्त…
मे 2022 मधील गृहप्रवेशाचे शुभ मुहूर्त…
तुम्ही मे महिन्यात गृहप्रवेशाचा विचार करत असात तर या महिन्यात अनेक शुभ मुहूर्त आहेत. गृहप्रवेशासाठी 2, 11, 12, 13, 14, 16, 20, 25, 26 आणि 30 मे हे सर्व दिवस शुभ आहेत. या पैकी कोणत्याही दिवशी तुम्ही नव्या घरात प्रवेश करू शकतात.
मे 2022 मधील विवाह मुहूर्त
मे महिन्यात विवाहाचे एकूण 15 शुभ मुहूर्त आहेत. तुम्ही 02, 03, 09, 10, 11, 12, 15, 17, 18, 19, 20, 21, 26, 27 आणि 31 मे विवाहाची तारीख निश्चित करू शकतात. यात अक्षय्य तृतीया म्हणजेच 03 तारीखेचा मुहूर्त सगळ्यात उत्तम आहे.
मे 2022 मधील प्रॉपर्टी खरेदीचे मुहूर्त
मे महिन्यात तुम्ही 6, 7, 10, 11, 15, 16, 19, 24, 25, 26 आणि 31 मे रोजी प्रॉपर्टी खरेदी करू किंवा विक्री करू शकतात. या दिवशी तुम्ही प्रॉपर्टीचे टोकन म्हणजेच अॅडव्हास देखील देऊ शकतात.
मे 2022 मधील मौज मुहूर्त
मुलांचे मौज करण्यासाठी मे महिन्यात 6 शुभ मुहूर्त सांगण्यात आले आहेत. 4, 6, 13, 14, 27 आणि 28 मे रोजी तुम्ही मौज करू शकतात.
मे 2022 मधीनल नामकरण मुहूर्त
तुम्ही बाळाचे नाव ठेवण्याचा म्हणजेच त्याचे नामकरण विधी करण्याचे ठरवत असाल तर मे महिन्यात 13 शुभ मुहूर्त सांगण्यात आले आहेत. 3, 4, 5, 8, 12, 13, 16, 17, 20, 21, 22, 30 आणि 31 तारीख सगळ्यात उत्तम आहे.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या