Mobile Overuse Problems: वेळीच सावध व्हा! मोबाईलचा अतिवापर करताय, या गंभीर समस्यांचा करावा लागेल सामना!
Mobile Overuse Problems : स्मार्टफोनला आपल्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधरण महत्व आहे. पण स्मार्टफोनचा अतिवारप करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्याच्या अतिवापरामुळे डोळे, हात, त्वचा, झोप यावर विपरित परिणाम होत आहे.

Mobile Overuse Problems : सध्याच्या काळामध्ये स्मार्टफोन (Smartphones) ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. स्मार्टफोनशिवाय जगणं देखील कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा स्मार्टफोनची सवयी लागली आहे. महत्वाचे म्हणजे स्मार्टफोनमुळे आपली दररोजची कामं देखील सोपी झाली आहेत. स्मार्टफोनच्या वापरामुळे इतरांशी कॉन्टॅक्ट करणे, पैशांचे व्यवहार करणे (Payment) , शॉपिंग करणे (Shopping) खूपच सोपे झाले आहे. ऐवढंच नाही तर कोरोनाच्या काळापासून मुलांचे ऑनलाईन क्लासेस (Online Classes) मोबाईलवरच सुरु आहेत. त्यामुळे स्मार्टफोन किती अत्यावश्यक झालाय हे सर्वांनाच माहिती आहे.
Also Read:
स्मार्टफोनवर गेम्स, गाणी, ओटीटी प्लॅटफॉर्म असे अनेक मनोरंजनाचे पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे आपले मनोरंजन सुद्धा होते. या स्मार्टफोनची जास्त गरज प्रवासा दरम्यान भासते. त्यामुळे स्मार्टफोनला आपल्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधरण महत्व आहे. पण स्मार्टफोनचा अतिवारप करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्याच्या अतिवापरामुळे डोळे, हात, त्वचा, झोप यावर विपरित परिणाम होत आहे. स्मार्टफोनचा शारीरिक स्वास्थावर होणारा परिणाम खूपच घातक असून, हा धोका टाळण्यासाठी वेळीच स्मार्टफोन दूर ठेवणे गरजेचे आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे नेमका काय त्रास होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत…
झोपेवर होतो परिणाम (Sleep Problem) –
माणसाच्या आयुष्यामध्ये झोप (Sleep) ही खूप महत्वाची आहे. रोजच्या जीवनशैलीत चांगली झोप नसेल तर आपली कामं देखील बिघडतात. आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेवर विपरित परिणाम होत आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर केल्यामुळे झोपेचा कालावधी कमी होतो. त्यामुळे दिवसा उत्साह वाटत नाही आणि झोप येते. झोप अपुरी झाल्याने अनेक त्रास निर्माण होतात. यासाठी झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा.
ताण वाढू शकतो (Stress Increase) –
मोबाइलच्या अतिवापरामुळे ताण वाढू शकतो. मोबाईलवर सतत काहीतरी वाचणं, उशिरापर्यंत फोन बघणं, झोप पूर्ण न होणं या सगळ्यामुळे आपला ताण वाढतो. परिणामी आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात.
डोळ्यांवर विपरित परिणाम (Eyes Problem) –
मोबाइलच्या जास्त वापराचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या डोळ्यांवर (Eyes). डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील अवयव आहे. मोबाइलच्या स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या निळ्या किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, डोळे दुखणं तसंच डोळे कोरडे पडणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी स्मार्टफोन वापरताना अधूनमधून ब्रेक घेणे गरजेचे आहे.
मनगट दुखणं (Wrist pain) –
सतत मोबाइल हातात धरून मनगट (Wrist) दुखण्याचा त्रास होतो. सतत मोबाईल हातात पकडून मनगटाच्या स्नायूंवर ताण येतो त्यामुळे मनगट दुखणं, बधिर होणं यासारखा त्रास होतो. यातून पुढे कार्पल टनलची गंभीर व्याधी उद्भवू शकते. यामुळे स्मार्टफोन हातात धरण्याचे प्रमाण कमी करणं गरजेचे आहे.
चेहऱ्यावर मुरूम आणि पुरळ येणं (Pimples Problems) –
स्मार्टफोनच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेवरही विपरित परिणाम होतो. अनेक संशोधनातू हे समोर आले आहे की, मोबाइलवरील जंतू, जीवाणू यामुळे त्वचेवर परिणा होतो. आपल्या चेहऱ्यावर मुरूम (Pimples) येऊ शकतात. यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. त्वचा सुरकुतलेली, निस्तेज दिसू लागते. हा त्रास टाळण्यासाठी मोबाइलचा वापर कमी करणे गरजेचे आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या