मुंबई: आजकाल मोबाईलचा (Mobile Phone) वापर कॉलिंग आणि इंटरनेटशिवाय वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. वेगवेगळे काम करताना अनेकांना फोनवर गाणी ऐकण्याची सवय असते. फोनवर गाणे ऐकण्याची सवय एवढी वाढली आहे की मॉर्निंग वॉक (Morning walk) करतानाही लोक मोबाईल वापरणे बंद करत नाहीत. मात्र या सवयीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला मॉर्निंग वॉक (Use Of Mobile) करतना फोन वापरण्याचे तोट्यांविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात… (Mobile Use During Walk: Do you also use mobile during morning walk? These problems can grow)

स्नायू दुखणे (Muscle pain) : चालताना आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. त्यामुळे तुम्ही एका हातात मोबाईल धरून चालता तेव्हा तुमच्या स्नायूंमध्ये असंतुलन निर्माण होते. यामुळे स्नायू दुखू शकतात.

बांधा खराब होतो (Body shape) : सकाळी चालताना फोनचा सतत वापर केल्याने आपल्या शरीराचा बांधा खराब होऊ शकतो. चालताना पाठीचा कणा नेहमी सरळ असावा. मोबाईल वापरल्याने आपले सर्व लक्ष त्यावरच राहते आणि आपला पाठीचा कणा सरळ राहत नाही. बराच वेळ असे चालणे तुमच्या शरीराचा बांधा खराब करू शकते.

पाठदुखी (Back pain) : बराच वेळ चुकीच्या पद्धतीने चालणे आपल्या शरीराच्या बांध्यासाठी अपायकारक ठरू शकते. चालतानाची मुद्रा चुकीची असेल तर ते समस्येचे कारण ठरू शकते. त्यामुळे मॉर्निंग वॉक करताना मोबाईलचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा.

एकाग्रतेचा अभाव (Lack of concentration) : चालताना आपले सर्व लक्ष फक्त आपल्या शरीरावर असायला हवे. परंतु मोबाईलच्या वापरामुळे हे शक्य होत नाही. त्यामुळे मॉर्निंग वॉकदरम्यान मोबाईलचा वापर करणे टाळा