मुंबई : पावसाळा ऋतू अनेकांना आवडतो. मान्सूनचा पाऊस आपल्या आयुष्यातील बालपणीच्या आणि तारुण्यातील अनेक आठवणी जागवत असतो. पावसाळ्याचा हंगाम तसा सर्वासाठी चांगला असतो, मात्र तो आपल्यासोबत आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या देखील घेऊन येतो. या हंगामात केस गळणे ही मुख्य समस्या आहे. पावसाळ्यात केस गळणे ही महिलांसाठी मोठी समस्या आहे. पावसाळ्याचा हंगाम आपल्यासोबत आर्द्रता घेऊन येतो. त्यामुळे केस गळण्याची समस्या (Monsoon Hair Fall) सुरू होते. म्हणूनच पावसाळ्यात केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आम्ही आज तुम्हाला पावसाळ्यात होण्यारी केस गळतीरोखण्यासाठी काही उपाय (Monsoon Hair Fall Tips) सागंत आहोत.Also Read - Hair Care Tips : पावसाळ्यात केस गळती होतेय, एकदा चण्याच्या डाळीचा हेअर मास्क जरुर ट्राय करा!

पावसात भिजल्यानंतर लगेच शैम्पू करा : जर तुमचे केस पावसात भिजले असतील तर त्यानंतर लगेच केस शैम्पूने धुवायला विसरू नका. कारण पावसाच्या पाण्यामध्ये केमिकल आणि कार्बन असते. यामुळे केसांचं नुकसान होतं आणि केस गळतीची समस्या सुरू होते. पावसात बाहेर पडताना आपले केस झाकलेले राहतील याची काळजी घ्या. असे शक्य नसल्यास घरी येऊन लगेच सौम्य शैम्पूने केस धुवा. Also Read - Hair Care : तेल लावल्यानंतर तुमचे केस गळतात? जाणून घ्या काय असू शकते कारण

हीट टूल्सचा वापर कमी करा : पावसाळ्यामध्ये केसांवर स्ट्रेटनर, हेयर ड्रायर किंवा कर्लर यासारख्या उष्ण साधनांचा वापर कमीत कमी करावा. पावसाळ्यात या साधनांचा वापर केल्याने केसांची मुळे खूप कमकुवत होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केस गळतात. Also Read - जाणून घ्या संत्री खाण्याचे 10 फायदे - Santri Khanyache Fayde

केसांवर तेल मालिश करा : पावसाळ्यात केसांवर कोमट तेलाची मालिश करा. गरम तेलाने मालिश केल्याने केस गळण्याची समस्या कमी होते. याशिवाय तेल गरम केल्याने ते थोडे पातळ होते आणि टाळूवर चांगल्या प्रकारे शेषले जाते.

ओले केस बांधू नका : जर तुमचे केस पावसात ओले झाले असतील तर त्यांना बांधून ठेवण्याची चूक करू नका. यामुळे केस आणखी तुटतात.