मुंबई : आपण सर्व आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांची विशेष काळजी घेत असतो. बदलत्या ऋतूंसह आपण आपले केस, त्वचा इत्यादीची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतो. मात्र, आपले ओठांकडे दुर्लक्ष होत असते. ओठ (lip care) देखील आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि ओठ आपले सौंदर्य वाढवण्यात मोठी भूमिका निभावतात. त्यामुळं बदलत्या ऋतूंबरोबरच ओठांचीही विशेष काळजी घेणे (Monsoon Lips Care Tips) आवश्यक आहे. पावसाळ्यात ओठांची अतिरिक्त काळजी (lip care in monsoon) घेणे गरजेचे असते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला ओठांना मऊ (soft lips) ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत…Also Read - Winter Lips Care Tips: हिवाळ्यात अशी घ्या ओठांची काळजी, हे घरगुती उपाय करून ठेवा मऊ आणि गुलाबी

स्क्रब : ज्या प्रकारे आपण त्वचेवर स्क्रब करून मृत त्वचा काढून टाकतो त्याच प्रकारे आपण ओठांवरही स्क्रब केले पाहिजे. यामुळे मृत त्वचा निघून जाते. यासाठी आपण मध आणि साखर मिसळून स्क्रब तयार करू शकता.

मालिश : रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेलाने ओठांवर मालिश करा. यामुळे ओठांमध्ये रक्तसंचार चांगला होतो आणि ओठ मऊ होतात.

लिप बाम : लिप बामच्या मदतीने आपण आपल्या ओठांना कोरडेपणापासून वाचवू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लिप बाम लावा.

लिपस्टिक : नेहमीच दर्जेदार लिपस्टिक लावा. त्यामुळे ओठ काळे होत नाहीत. एका गोष्टीची काळजी घ्या की, घरी आल्यानंतर तुमच्या मेकअपसोबतच लिपस्टिक देखील काढून टाका.

हायड्रेट क्रीम : पावसाळ्यात रात्री ओठ कोरडे पडतात. अशा वेळी ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी रात्रभर ओठांवर हायड्रेट क्रीम लावू शकता. तसेच रात्री झोपताना पेट्रोलिअम जेली अथवा तुप लावून ठेवले तर ओठ सुकणार नाहीत.

गाजराचा रस : गाजराचा रस किंवा गर घेऊन त्यात अर्ध्या चमचा मध घाला. हे मिश्रण एकत्र करून तो लेप ओठांवर लावा आणि अर्धा तासाने ओठ स्वच्छ धुवा. गाजरामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे ओठ मऊ राहतात.

गुलाबाच्या पाकळ्या : कोणत्याही ऋतूमध्ये ओठ सुंदर आणि नरम ठेवण्यासाठी पाण्यात भिजवलेल्या काही गुलाबाच्या पाकळ्या ओठांवर रगडा. या उपायाने ओठ गुलाबी आणि चमकदार होतील. यामुळे लिपस्टिक लावण्याची गरज भासणार नाही.

दुधाची साय : रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर ओठांवर दुधाची साय, लोणी किंवा तुपाने हलक्या हाताने मालिश करा.