मुंबई : पावसाळा (Monsoon) सुरु झाला आहे. पावसाळा आपल्यासोबत अनेक प्रकारचे आजारही घेऊन येतो. पावसाळ्यात होणारा सामान्य आजार म्हणजे मलेरिया. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामध्ये पैदास होणाऱ्या डासांमुळे (mosquitoes) मलेरिया होतो. जर मलेरियावर (Malaria) योग्य वेळी उपचार केले नाही तर ते अत्यंत धोकादायक सिद्ध होऊ शकते. तुम्ही काही सोप्या मार्गांनी किंवा (Monsoon Malaria Prevention Tips) योग्य पद्धतीने काळजी घेतली तर या आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रकारे काळजी घेऊन मलेरियापासून स्वत:चा बचाव करु शकता हे सांगणार आहोत…Also Read - Hair Care Tips : पावसाळ्यात केस गळती होतेय, एकदा चण्याच्या डाळीचा हेअर मास्क जरुर ट्राय करा!

यावेळी घराबाहेर पडू नका (Dont go out this time) –

संध्याकाळच्या वेळी डास सर्वाधिक असतात. संध्याकाळच्या वेळी म्हणजे अंधार झाला की मच्छर मोठ्याप्रमाणात बाहेर येतात. अशावेळी ज्याठिकाणी मच्छर जास्त असतात अशा ठिकाणी जाणं टाळा. उदाहरणार्थ गार्डन, झाडांच्या ठिकाणी जाणं टाळा. Also Read - Diabetes च्या रुग्णांसाठी वरदान ठरतोय हा खास चहा, रोज प्यायला तर हृदयसुद्धा राहिल निरोगी!

हायड्रेटेड राहा (Stay hydrated) –

जर तुम्ही हायड्रेटेड असाल तर तुम्ही मलेरियापासून स्वत:चा बचाव करु शकता. बदलत्या हवामानामुळे शरीर उबदार राहते. त्यामुळे सामान्य राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. पुरेसे पाणी पिण्यासोबतच जूस, नारळाचे पाणी इत्यादींचे देखील सेवन तुम्ही करु शकता. Also Read - Monsoon Update : पावसाची लपाछपी सुरुच! पुढील 3 ते 4 दिवस कोकणात पडणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज!

मच्छकदानीचा वापर करा (Use a mosquito net) –

मलेरियापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुम्ही झोपताना मच्छरदानीचा वापर करु शकता. रात्रीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दिवसाही झोपत असाल तर मच्छरदानीचा वापर करु शकता.

पाणी साठवून ठेवू नका (Do not store water) –

घरामध्ये पाणी साठवून ठेवू नका. भांड्यांमध्ये जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नका. कूलर तसंच फ्रीज स्वच्छ करत जा. यामध्ये पाणी राहिल्यामुळे त्यात मच्छर होण्याची शक्यता आहे.

घराच्या आसपासचे परिसर स्वच्छ ठेवा (Keep the area around the house clean) –

पावसाळ्यात मोकळ्या ठिकाणी पाणी साचू देऊ नका. घराभोवती नाले स्वच्छ ठेवा. साचलेल्या पाण्यात मच्छर अंडी देतात आणि मोठ्याप्रमाणात मच्छर होतात. पावसाळ्यात मच्छर मारण्याच्या औषधांची नियमित फवारणी करत जा.