मुंबई: अनेक वेळा असं घडतं की तुम्ही एखादे काम हातात घेता आणि ते पूर्ण होत नाही. मेहनत करूनही अनेक वेळा काम होत नाही. कधीकधी यामागे पहाटेचे कारण असू शकते. वास्तु विज्ञानमध्ये (Vastu Tips) अशा काही कामांबद्दल सांगितले आहे जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर (Morning Vastu Tips) चुकूनही करू नये. या कामांबद्दल जाणून घेऊयात.(Morning Vastu Tips in Marathi: Don’t do this work when get up in the morning, whole day will be wasted; work will Spoiled )Also Read - Vastu Tips: घरात हवी असेल सुख, शांती तर नवरात्रीमध्ये पाळा या वास्तू टिप्स

सकाळी उठल्यावर पाहू नका या गोष्टी

सावली : सकाळी उठल्यानंतर स्वतःची किंवा इतर कोणाची सावली कधीही पाहू नका. असे झाल्यास दिवसभर प्रत्येक कामात निराशेला सामोरे जावे लागू शकते. Also Read - Kitchen Vastu Tips : घरात सुख-शांती हवी असेल तर स्वयंपाकघरात ठेवू नका या वस्तू; मानले जाते अशुभ

न धुतलेले/घाणेरडी भांडी – सकाळी न धुतलेली/घाणेरडी भांडी पाहू नये. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. जर तुम्ही एखादे विशिष्ट काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर ते अपूर्ण राहू शकते. त्यामुळे रात्री कधीही स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवू नका. तुम्हाला हवे असल्यास भांडी अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर नजर जाणार नाही. Also Read - Vastu Broom Tips: घरात आणि कार्यालयात झाडू वापरताना कधीच करू नका या चुका? होतात वाईट परिणाम

आरसा – सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहू नये. असे केल्याने तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. तसेच तुमचे कामही बिघडू शकते. तुम्ही जर घरात वन्यजीवांचे फोटो लावले असेल तर सकाळी उठताच ते पाहणे टाळा. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो आणि घरात समस्या वाढण्याची शक्यता असते. (Morning Vastu Tips in Marathi: Don’t do this work when get up in the morning, whole day will be wasted; work will Spoiled )