मुंबई : एखाद्या व्यक्तीला डास चावल्यानंतर (Mosquito Bites) त्या ठिकाणी खाज सुटणे आणि असह्य वेदना या सारखा त्रास जाणवतो. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपचारांद्वारे (Mosquito Bites Home Remedies) या वेदनांपासून आणि जळजळीपासून मुक्त होऊ शकता. आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपाय (Mosquito Bites Home Remedies)सांगत आहोत ज्यामुळे डासांच्या चावण्याचा परिणामांपासून तुम्ही मुक्त होऊ शकता.Also Read - Blood Pressure Control Tips : रक्तदाब राहील नियंत्रणात, फक्त रिकाम्या पोटी करा 'हा' घरगुती उपाय

बर्फ घासणे (Rubbing ice)

डास चावल्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी बर्फाची अतिशय मदत होऊ शकते. यासाठी एका स्वच्छ सूती कपड्यात बर्फ गुंडाळा आणि तो हळूवारपणे डास चावलेल्या भागावर घासा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. Also Read - Teeth Care Tips : तुम्हाला दातांशी संबंधित समस्या आहे का? मग करा 'हा' रामबाण उपाय

कोरफड जेल (Aloe vera gel)

कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात. कोरफडचा वापर डास चावल्यानंतर होणारी जळजळ, दुखणे, आणि सूज यापासून आराम मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी कोरफडीचे पान कापून धुवून घ्या आणि चमचाच्या सहाय्याने त्यातील जेल बाहेर काढा. हे जेल डास चावलेल्या ठिकाणी लावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. Also Read - Skin Care Tips : चमकदार चेहरा मिळवण्यासाठी अर्जुनच्या सालीचा असा करा वापर, त्वचेसंबंधी अनेक समस्या होतील दूर

लिंबाचा रस (Lemon juice)

लिंबू अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल घटकांनी समृद्ध असते. डास चावल्यानंतर होणारी जळजळ आणि खाज सुटणे यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लिंबू अतिशय उपयुक्त ठरू शकते.

बेकिंग सोडा (Baking soda)

डास चावल्यानंतर बेकिंग सोडा देखील वापरला जाऊ शकतो. यामुळे देखील वेदना, सूज आणि जळजळ कमी करण्यास देखील मदत होईल. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये पाण्याचे काही थेंब घालून जाड पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट डास चावलेल्या भागावर लावा.

कांदा (Onion)

डास चावल्यामुळे होणारी जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी कांदा देखील उपयुक्त असतो. कांदा त्वचेवर लावल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते. कांदा लावल्यानंतर तो भाग पाण्याने स्वच्छ धुवा.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

डास चावल्यामुळे त्रास होत असलेल्या जागेवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने आराम मिळू शकतो. यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.